गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आलाय. IAS रणजीत कुमार हे गुजरात विद्युत नियामक आयोगाचे (GERC) सचिव आहेत. त्यांची पत्नीच विवाहबाह्य संबंध होते. धक्कादायक म्हणजे एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचं स्थानिक गुंडावर प्रेम जडल होतं. तब्बल 9 महिन्यांपूर्वी ती घर सोडून हायकोर्ट महाराज या गुंडासोबत पळून गेली होती. आता ती परत आल्यानंतर घरी येण्यासाठी तिने पतीवर दबाव टाकत होती. (IAS wife falls in love with High Court Maharaja gangste love affair return husband home after 9 month viral news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही महिन्यांपासून त्याची पत्नी 45 वर्षीय सूर्या हिच्यासोबत त्याचं भांडण सुरु होतं. सूर्याला घरात येऊ देऊ नका, अशी सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना केली होती. अशा स्थितीत सूर्या शनिवारी सकाळी घरी पोहोचली तेव्हा गार्डने तिला गेटवरच थांबवलं. सूर्याने आत जाण्यासाठी खूप विनंती केली, पण काही न झाल्याने तिने बंगल्याच्या दारातच विष प्राशन केलं. यानंतर तिला तातडीने गांधीनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 


या महिलेचे माहेर तामिळनाडूमध्ये असून तिथून ती एका गुंडासह पळून गेली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलंय की, 'आयएएस रणजीत कुमार शनिवारी घटस्फोटाच्या अर्जावर अंतिम निर्णय घेण्यासाठी सूर्यासोबत बाहेर गेले होते. त्यानंतर सूर्याने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण तिला रोखण्यात आले म्हणून तिने विष प्राशन केले. गांधीनगरचे एसपी रवी तेजा वासमसेट्टी यांनी सांगितलंय की, पोलिसांना तामिळ भाषेतील कथित सुसाईड नोट सापडली असून त्यांनी या घटनेची अधिक कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय. 


पण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मदुराई अपहरण प्रकरणात तामिळनाडू पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी सूर्या तिच्या पतीच्या घरी गेली असावी. कारण 14 वर्षाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात सूर्याचं नाव पुढे आलं होतं. या प्रकरणात तिचा कथित प्रियकर आणि 'हायकोर्ट महाराज' म्हणून ओळखला जाणारा स्थानिक गुंड आणि त्याचा सहकारी सेंथिल कुमार यांचा सहभाग होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या आईसोबत पैशाच्या वादातून त्यांनी 11 जुलैला मुलाचं अपहरण केलं होतं. त्यांनी त्याच्या आईकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, मात्र मदुराई पोलिसांनी मुलाची सुटका केली. यानंतर पोलिसांनी सूर्यासह सर्व आरोपींचा शोध सुरू केला होता.