IB Recruitment 2023 Apply Online: सरकारी नोकरी असावी, अशी सर्वांना इच्छा असते. अशातच आता गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरोने कनिष्ठ गुप्तचर अधिकारी या पदांसाठी  (IB Recruitment 2023) भरती प्रकिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता तरुणांमध्ये जोश निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 31 मे 2023 पासून सुरू झाली आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे. या भरती (IB Recruitment 2023) प्रक्रियेअंतर्गत एकूण 797 पदे भरली जातील. यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल? जाणून घ्या


शैक्षणिक पात्रता


अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार किंवा संगणक विज्ञान यासारख्या क्षेत्रातील अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, भौतिकशास्त्र, गणित यासारख्या तज्ञ विषयांसह विज्ञान पदवीधर असणं आवश्यक आहे. याच उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.


इथे पाहा नोटिफिकेशन < क्लिक करा 


अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती?


सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल आहे. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावं, अशी अट ठेवण्यात आली आहे. भरल्या जाणार्‍या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे...


आरक्षण नसलेली 325 पदं आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी म्हणजेच EWS साठी  79 पदं राखीव ठेवण्यात आलीत. तर ओबीसी वर्गासाठी 215 पदं आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जातींसाठी 119 तर  नुसूचित जमातींसाठी 59 पदं राखीव ठेवण्यात आली आहेत.  


आणखी वाचा - Aadhar Update: प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी, 10 दिवसांनंतर 'आधारकार्ड' मोफत अपडेट करता येणार नाही


ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख - 3 जून


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 जून


अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख - 27 जून