Aadhar Update: प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी, 10 दिवसांनंतर 'आधारकार्ड' मोफत अपडेट करता येणार नाही

Free Aadhar Update : आधारकार्डमध्ये कोणतेही बदल करायचे असल्यास 15 जूनपर्यंत कोणतंही शुल्क (fees) आकारलं जाणार नाही. पण त्यानंतर पैसे मोजावे लागणार आहेत. सर्व्हिस सेंटरमधून (Service Centre) अपडेट करण्यासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. 

| Jun 05, 2023, 19:21 PM IST
1/5

Aadhar Update: आधारकार्डमध्ये कोणतेही अपडेट करण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. आधारकार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मदिन किंवा मोबाईल अपडेट करायचा असल्यास तुमच्याकडे केवळ 10 दिवसांचा अवधी आहे. 

2/5

UIDAI तर्फे मोफत सेवा लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधारकार्डमध्ये कोणतेही बदल करायचे असतील तर 15 जूनपर्यंत करुन घ्या. गेल्या दहा वर्षात आधारकार्ड एकदाही अपडेट न करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

3/5

आतापर्यंत UIDAI च्या वेबसाईटवर युजर आधारकार्डमध्ये मोफत बदल करु शकत होते. पण आता UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार 15 जून 2023 पर्यंतच मोफत सेवा सुरु राहिल. त्यानंतर कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी शुल्क आकारलं जाईल. किती शुल्क आकारलं जाईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

4/5

सर्व्हिस सेंटरमधून आधारकार्ड अपडेट करुन घेण्यासाठी आता 50 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. पण 15 जूनच्या आधी तुम्ही माहिती अपडेट केली तर यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाहीत.

5/5

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सर्वात आधी UIDAI वेवसाईटवर जा. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरने त्यावर लॉगिन करा. आता तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे, त्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमची माहिती भरु शकता. तुमच्या माहितीची सत्यता पडताळणी करण्यासाठी संबंधीत कागदपत्राची लिंक जोडा.