मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या ICICI ने पुन्हा मुदत ठेवी (Fixed Deposit)वरील व्याजदरात वाढ केली आहे. याआधीदेखील ICICI बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन व्याजदर 2 कोटीपेक्षा अधिक आणि 5 कोटींपेक्षा कमी किंमतीच्या मुदत ठेवींवर लागू असणार आहे.  ICICI बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरे गेल्या महिन्यातच वाढवली होते. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला होता. 


ICICI बँकेच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, 2 कोटी ते 5 कोटींपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवण्यात आले आहेत. नवीन व्याज दरे 11 जुलै 2022 पासून लागू करण्यात आली आहेत. 


बँकने 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवींसाठी नवीन व्याजदर लागू केले आहेत. बँकेने ग्राहकांना 3.10 टक्के ते 5.75 टक्क्यांपर्यंतचे व्यादरे ऑफर केली आहेत.