ICICI बँकेने केली फक्त एक चूक, 16 हजार करोड रुपये बुडले
बँकिंग सेक्टरचे वाईट दिवस कधी संपणार काय माहित? गेल्या दीड महिन्यापासून बँकिंग सेक्टरची अवस्था खूप बीकट आहे. आरबीआयच्या नियमांना घेऊन बँका गंभीर नसल्याच समोर येत आहे. पीएनबी बँके्या पाठोपाठ अनेक घोटाळे समोर येत आहे. आता आयसीआयसीआय बँक देखील गेल्या काही दिवसांपासून 3250 करोड रुपयांच्या `स्वीट डील`च्या प्रश्नात अडकली आहे. आता बँकेचे एमडी चंदा कोचर यांच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न आहे की ही खरंच धोक्याची घंटा आहे ते मात्र अद्याप कळत नाही. आता अशी माहिती समोर येते की बँकेचे 16 हजार करोड रुपये बुडाले आहेत.
मुंबई : बँकिंग सेक्टरचे वाईट दिवस कधी संपणार काय माहित? गेल्या दीड महिन्यापासून बँकिंग सेक्टरची अवस्था खूप बीकट आहे. आरबीआयच्या नियमांना घेऊन बँका गंभीर नसल्याच समोर येत आहे. पीएनबी बँके्या पाठोपाठ अनेक घोटाळे समोर येत आहे. आता आयसीआयसीआय बँक देखील गेल्या काही दिवसांपासून 3250 करोड रुपयांच्या 'स्वीट डील'च्या प्रश्नात अडकली आहे. आता बँकेचे एमडी चंदा कोचर यांच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न आहे की ही खरंच धोक्याची घंटा आहे ते मात्र अद्याप कळत नाही. आता अशी माहिती समोर येते की बँकेचे 16 हजार करोड रुपये बुडाले आहेत.
लोन की स्वीट डील
आयसीआयसीआय बँक आणि वीडियोकॉन ग्रुप यांच्यात झालेल्या 3250 करोड रुपयांची डील ही काही सामान्य गोष्ट नाही. यामध्ये बँकेने एमडी चंदा कोचर यांच्यावर वेगळ्या पद्धतीने वीडियोकॉन ग्रुपला 3,250 करोड रुपये लोन देण्यावरून आरोप लावले आहेत. या डीलमध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच नाव देखील सहभागी आहे.
3 दिवसांत शेअर कोसळले
वीडियोकॉनचे लोन प्रकर समोर आल्यावर आयसीआयसीआय बँकेचे शेअर तुटले आहेत. गुंतवणूकदार आता या बँकेचे शेअर विकत आहे. आता ब्रोकरेज हाऊस देखील यात पैसे गुंतवणूक करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 3 दिवसांत आयसीआयसीआय बँकेचे शेअर 8.80 टक्यांनी तुटले आहे. यामध्ये मार्केट कॅप 16,090.64 करोड रुपये घसरण झाले आहेत. 27 मार्चला मार्केट बंद झालं तेव्हा 283.90 रुपयांनी मार्केट कॅप 1,82,725.35 करोड रुपयांत होते. जे तीन दिवसांत 1,66,634.71 करोड रुपयांवर पोहोचले आहे.