आयसीआयसीआय बँकेकडूनही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात
तुमचं जर आयसीआयसीआयमध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केलीये.
मुंबई : तुमचं जर आयसीआयसीआयमध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केलीये.
बचत खात्यांमध्ये ५० लाखांहून कमी जमा असलेल्या रकमेवरील व्याजदारात अर्ध्या टक्क्यांची कपात करत ३.५ टक्क्यांपर्यंत आणलेत. बँकेने शेअर बाजाराला पाठवलेल्या सूचनेमध्ये ५० लाखाहून अधिक जमा असलेल्या रकमेवरील चार टक्के व्याजदर कायम राहणार आहेत असं स्पष्ट केलंय. शनिवारपासून नवे व्याजदर लागू करण्यात आलेत.
याआधी ३१ जुलैला भारतीय स्टेट बँकेने बचत खात्यांमधील एक कोटी आणि त्याहून कमी जमा असलेल्या रकमेवरील व्याजदार अर्ध्या टक्क्यांची कपात करताना ते दर ३.५ टक्क्यांपर्यंत आणले होते. त्यानंतर एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि अॅक्सिस बँकेनेही व्याजदरात कपात केली.