Is reheating of oil safe? : स्वयंपाक बनवताना अनावधानानं अनेक अशा चुका घडतात, ज्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. केंद्र शासनाच्याच अख्त्यारित येणाऱ्या ICMR कडून याबाबत सजग करण्यात आलं आहे. तळलेले पदार्थ तयार करत असताना ते पदार्थ तेलानं भरलेल्या कढई, पात्रातून तळून काढल्यानंतर उरलेल्या तेलाचा पुन्हापुन्हा वापर करण्यावर अनेकांचाच भर असतो. किंबहुना वारंवार वापरूनही कित्येकदा हे तेल संपत नाही. मग अशा तेलाचं काय करावं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)नं नुकत्याच जारी केलेल्या निर्देशांनुसार कोणत्याही प्रकारचं वनस्पती किंवा इतक घटकांपासून तार करण्यात आलेलं तेल वारंवार तापवू नये. वनस्पती तेल वारंवार तापवल्यामुळं त्यात विषारी घटक निर्माण होऊन त्यामुळं हृदयरोग आणि कर्करोगासारखी गंभीर आजारपणं उदभवण्याचा धोका अधिक वाढतो. 


खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात आलेलं तेल वारंवार गरम केल्यास त्यात निर्माण होणाऱ्या विषारी घटकांमुळं शरीरात फ्री रॅडीकलचं प्रमाण वाढून त्यामुळं शरीराला सूज येण्यासोबतच इतर गंभीर आजारपणांचा धोका उदभवतो. 


बाहेरचे अन्नपदार्थ खाताय? 


आयसीएमआरच्या सूचनांनुसार घरातच नव्हे, तर बाहेरही वापरलेल्याच तेलापा पुन्हापुन्हा वापर करत खाद्यपदार्थ तयार केले जातात. यामुळं शरीरातील trans fat चं प्रमाण वाढून त्यामुळं हृदयाच्या समस्या अधिक बळावतात. ज्यामुळं वनस्पती तेलाचा वापर स्वयंपाकात भाज्या बनवण्यासाठी करणं योग्य ठरतं अशा सूचना आयसीएमआरनं केल्या आहेत. एका वापरातील तेल उरल्यास ते जास्तीत जास्त आणखी दोन वेळा वापरता येतं. त्यापलिकडे त्याचा वापर आरोग्यास घातक ठरू शकतो. 


हेसुद्धा वाचा : स्वयंपाक करताना 'या' चुका टाळा... सरकारच्या सूचनांनंतर अनेकांना बदलावी लागणार जेवणाची पद्धत


 


अन्नपदार्थ तयार करत असताना ते योग्य तापमानावर शिजवणंही तितकंच महत्त्वाचं असून, त्यामध्ये तेलाचा अवाजवी वापर टाळावा असं आवाहन तज्ज्ञ मंडळीसुद्धा करतात. त्यामुळं तुम्हीही वापरलेलं तेल पुन्हा वापरत असाल तर आताच ही सवय थांबवा.