Atiq ahmed children Result: आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पेढे वाटू लागले आहेत. प्रत्येक मुलाच्या घरची परिस्थिती वेगवेगळी असते. त्यांच्या अभ्यासाला ही परिस्थितीदेखील कारणीभूत असते. अनेकांना घरी अभ्यासाचे चांगले वातावरण मिळूनही अभ्यासाचा कंटाळा येत असतो. तर काही विद्यार्थ्यांना घरच्या परिस्थितीमुळे व्यवस्थित अभ्यास करता येत नाही. तरीही ते परीक्षेत चांगले गुण मिळवतात. याचीच प्रचिती आयसीएसई बोर्ड परीक्षेचा निकालात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुख्यात गुंड अतिक अहमदचे नाव मागच्या काही दिवसांपुर्वी चर्चेत होते.  गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात होती. वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला. अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. अतिक अहमदच्या संपत्तीचे वारसदार कोण? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. तेव्हा त्याच्या मुलांची नावे समोर आली होती. आता या मुलांच्या परीक्षेचे निकाल लागले आहेत. त्यामुळे मुलांबद्दल चर्चा होऊ लागली आहे.


दोघांचेही निकाल समोर


गुंड अतिक अहमदला अहजम अहमद आणि अबान अहमद ही 2 मुले आहेत. नुकताच आयसीएसईचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर अहजम आणि अबान दोघांचेही निकाल समोर आले. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आयसीएसई निकालात दोन्ही मुलांना 70 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. 


गेल्यावर्षी दिली नव्हती परीक्षा


अतिकची दोन्ही मुले जोसेफ कॉलेजमध्ये शिकत आहेत. गेल्यावर्षी वडिलांची हत्या झाल्यानंतर दोन्ही मुले परीक्षा देऊ शकले नव्हते. यावर्षी दोघांनी ऑफलाइन माध्यमातून परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्यांना चांगले यश प्राप्त झाले आहे. 


दहावी-बारावीनंतर थेट सरकार नोकरी, निकाल लागल्यावर 'येथे' करा अर्ज 


अहजम अहमद हा दहावीमध्ये तर अबान अहमद हा हायस्कूलचे शिक्षण घेत होता. दोघांनी परीक्षेत चांगले यश मिळवले. हे दोघे कधी शाळेत आले नाही. पण प्रत्येक प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करायचे. दोघांनी खूप मेहनत घेऊन परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली. 


केवळ परीक्षा द्यायला आले शाळेत


आजुबाजूच्या परिस्थितीमुळे दोघे शाळेत येऊ शकले नाहीत. पण याचा त्यांच्या अभ्यासावर काही परिणाम झालेला कधी दिसला नाही. दोघांनी ऑफलाइन माध्यमातून परीक्षा दिली होती. केवळ परीक्षा देण्यासाठी ते शाळेत आले होते, असे मुख्याध्यापक पुढे म्हणाले. अहजम आणि अबान यांच्या वडिल आणि काकांची गेल्यावर्षी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मुलांना शाळेत पाठवण्यात आलं नव्हते.