IDBI Bank FD Rates |  IDBI बँकेने आपल्या ग्राहकांना भेट म्हणून 6 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेच्या वतीने एफडी आता 2.70 टक्क्यांवरून 5.60 टक्के करण्यात आली आहे. यापूर्वी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँकेसह अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IDBI Bank FD Rates: 


आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. HDFC, ICICI, SBI सोबत IDBI बँकेनेही व्याजदरात बदल केला आहे. आधी IDBI बँक सरकारी होती पण आता ती खाजगी बँक झाली आहे. यानंतर बँकेने ग्राहकांना व्याजदर वाढीची भेट दिली आहे.


20 एप्रिलपासून नवीन नियम लागू 


IDBI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (FD Interest Rate) व्याजदरात बदल केला आहे. यानंतर आता IDBI बँकेत एफडी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. व्याजदरातील बदल 20 एप्रिलपासून लागू झाला आहे.


या बँकांनी वाढवले व्याजदर 


बँकेने केलेल्या बदलांनंतर, IDBI बँक 6 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2.70 ते 5.60 टक्के व्याज देत आहे. आरबीआयने केलेल्या बदलांनंतर, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँकसह सर्व बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवण्याची घोषणा केली.