`या` बॅंकेकडून खातेधारकांना खूशखबर, FD वर इतक्या टक्क्याने अधिक व्याज
जर तुम्ही या बँकेत मुदत ठेव (Fixed Deposit) ठेवली असेल तर तुम्हाला अधिक व्याज मिळेल. बँकेने अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई : खाजगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेत (IDFC First Bank) खाते असलेल्या ग्राहकांसाठी गूड न्यूज आहे. जर तुम्ही या बँकेत मुदत ठेव (Fixed Deposit) ठेवली असेल तर तुम्हाला अधिक व्याज मिळेल. बँकेने अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. (idfc bank gave great news to customers 1 percent more interest will be available on bank fd)
1 टक्क्यांनी वाढ
नवीन व्याजदर 23 मे पासून लागू झालंय. बँकेने व्याजदरात पूर्ण 1 टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच आतापासून तुम्हाला 1 टक्के जास्त व्याज मिळणार आहे.
एफडी आणि व्याजदर
सध्या खासगी क्षेत्रातील बँक ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD ची सुविधा देत आहे. यामध्ये तुम्हाला 3.50 ते 6.25 टक्के व्याजाचा लाभ मिळेल. बँक आधी ग्राहकांना 7 ते 29 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के व्याजाचा लाभ देत होती. पण, आता ग्राहकांना 3.50 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
सोबतच 30 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच 91 ते 180 दिवसांच्या FDवर 4.50 टक्के दराने व्याज मिळेल. तर 181 ते 365 दिवसांच्या ठेवींवर 5.75 टक्के दराने व्याज मिळेल.
एक वर्षांपेक्षा अधिकच्या गुंतवणूकीवर खातेधारकाला 6 टक्के व्याज मिळणार आहे. 3 ते 5 वर्षांच्या ठेवीवर 6 टक्के व्याज दिला जाईल.