गुरुग्राम : गुरुग्रामच्या भोंडसीस्थित रायन इंटरनॅशनल शाळेच्या टॉयलेटमध्ये आठ वर्षांच्या चिमुकल्याचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रद्युम्न असं या चिमुकल्याचे नाव आहे. तो दुसरीत शिकत होता. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय. एजन्सीच्या माहितीनुसार, स्कूल बसचा ड्रायव्हर आणि शाळेच्या स्टाफचीही चौकशी करण्यात आलीये.


प्रद्युम्नच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी स्कूलबसचा कंडक्टर अशोकला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केलीये. दरम्यान, प्रद्युम्नच्या वडिलांनी मात्र या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर सवाल उपस्थित केलेत. आतापर्यंत कोणतेच पाऊल का उचलले गेले नाही? मी माझा मुलगा गमावलाय, अशा शब्दात त्यांनी याप्रकरणाच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. 


तसेच जर शाळेत मुलाची हत्या होते तर आम्ही कोणाच्या भरवशावर आपल्या मुलाला ८ तास शाळेत सोडून जायचे, असा सवालही प्रद्युम्नच्या वडिलांनी केला.