मुंबई : लोकांमध्ये फिक्स्ड डिपॉजिट सर्वात लोकप्रिय सेविंग टूल आहे. जर तुम्ही कोणत्याही बँकेत एफडी केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण एफडी (Fixed Deposite)  मॅच्युअर झाल्या झाल्या क्लेम करायला हवी. नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रिझर्व बँकेने एफडीशी संबधीत नियमांमध्ये बदल केला आहे. या बदलांमध्ये जर तुम्ही एफडी मॅच्युअर झाल्यानंतर देखील क्लेम करीत नसाल. तर पैसा बँकेकडे पडून राहतो. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेने नवीन नियमावली जारी केली आहे.


आपल्या नियमावलीमध्ये रिझर्व बँकेने म्हटले आहे की, एफडी मॅच्युअर झाल्यावर तिचे पेमेंट न झाल्यास किंवा क्लेम न केल्यास बँकेकडे पडून राहते. त्यावरील व्याज बचत दर किंवा कॉन्ट्रक्ट व्याज दर यापैकी जे कमी असेल त्या हिशोबाने मिळेल.


रिझर्व बँकेच्या नियमानुसार हा एक मुख्यदिशानिर्देश आहे. हा निर्णय सर्व बँकांना लागू असेल. यामध्ये कमर्शिअल, स्मॉल फायनान्स, अर्बन को ऑप, लोकल एरिआ, स्टेट को-ऑपरेटीव, डिस्ट्रिक कोऑपरेटीव बँकेचा सामावेश होतो.