What Will Happen If India Name Changes TLD : देशाचे नावात  इंडियाऐवजी (INDIA ) भारत (BHARAT) असा बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. G20 निमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.  इंडियाऐवजी भारत नाव बदलण्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात देशाचे नाव INDIA बदलून  BHARAT झाले तर याचा  भारतीय बेवसाईट्स तसेच .in डोमेनवर देखील परिणाम होऊ शकतो. 


भारतीय  बेवसाईट्सवर नेमका काय परिणाम होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाचे नाव INDIA बदलून  BHARAT झाले तर याचा मोठा फटका सर्व भारतीय बेवसाईट्सना बसू शकतो. सर्व भारतीय वेबसाइट्स या .in डोमेनवर कार्यरत आहेत. यामुळे डोमेन देखील बदलावे लागू शकते. वेबसाईट्समधील हा बदल फक्त चर्चेचा विषय आहे. INDIA बदलून  BHARAT झाल्यास TLD अर्थात  टॉप लेव्हल डोमेन काय ठेवावे याचा निर्णय चर्चा करुन घेतला जाऊ शकतो. 


देशाचे नाव बदलते तेव्हा TLD काय परिणाम होवू शकतो?


देशाचे नाव बदलल्यास याचा परिणाम टॉप लेव्हल डोमेनवर देखील होवू शकतो. TLD हे दोन-अक्षरी डोमेन असते. हे दोन शब्द देशाची ओळख किंवा देशाचा कोडवर्ड असतात.  जसकी अमेरिकेत .us , युनायटेड किंगडममध्ये .uk असं आहे. देशाचे नाव बदलते तेव्हा  TLD बदलायचे की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार संबधीत देशाला असतो. उदाहरणार्थ 2016 मध्ये चेक रिपब्लिक देशाने आपले नाव बदलून चेकिया असे केले. मात्र, त्यांनी आपल्या देशाच्या TLD मध्ये कोणताही बदल न करता .cr असेच ठेवले.


कोणत्याही देशाला आपले टॉप लेव्हल डोमेन बदलायचे असल्यास काय करावे लागते?


कोणत्याही देशाला आपले टॉप लेव्हल डोमेन बदलायचे असल्यास Internet Assigned Numbers Authority (IANA)  आणि ICANN यांची मदत घ्यावी लागते. कारण या संस्था  ग्लोबली डोमेन नेम आणि IP  अ‍ॅड्रेस मॅनेज करत असतात. टॉप लेव्हल डोमेन बदलल्यास वेबसाइटची URL, ईमेल अ‍ॅड्रेस  आणि इतर ओळख बदलतील. डोमेन रजिस्ट्रार आणि होस्टिंग प्रोवाइडर्स यांच्याकडून अपडेट करुन घेने गरजेचे आहे. या प्रोसेसमध्ये खूप वेळ जाऊन शकतो.  याचा वेबसाईटच्या रँकिंवर देखील परिणाम होवू शकतो.