मुंबई : एकीकडे कामाची घाई असते, तर दुसरीकडे कधी-कधी नळाला अतिशय कमी वेगाने पाणी येत. अशा परिस्थितीत आपण प्लंबरला बोलावून पैसे खर्च करतो. पण काही घरगुती ट्रिक्सचा उपयोग केला, तर त्या नक्की फायद्याच्या ठरतील. नळाला वेगाने येणार पाणी अचानक कमी होत? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर स्वच्छता नसल्यामुळे आणि खारट पाणी जमा झाल्यामुळे नळाला कमी वेगाने पाणी येत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्याही नळाला पाणी कमी येत असेल, तर या 4 ट्रिक्स नक्की वापरा 
- बाथरुमच्या नळाला पाणी कमी वेगाने येत असेल, तर घाणेरड्या हातांनी स्पर्ष केल्यामुळे साबण आणि इतर घाण नळात जमा होते.  नळावर खारट पाणी साचल्याचं  पांढरे डाग पडतात. याला लिमस्केल बिल्डअप असं म्हणतात. म्हणून नळाला पाणी कमी वेगाने येतं. 


- नळावर डाग किंवा घाण जमा झाली असेल, तर बेकींग सोडा, व्हिनेगर, लिंबाची साल, हार्पिक घरात उपस्थित असलेल्या पदार्थाचा वापर करून तुम्ही नळ स्वच्छ करु शकता. 


- नळावर पाण्यामुळे गंज येऊ शकतो. गंजलेले डाग स्वच्छ करण्यासाठी व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा प्रमाणात मिसळा त्यानंतर पेस्ट गंजलेल्या डागांवर लावा. टुथब्रशचा वापर करून तुम्ही नळाच्या नोझलमध्ये लावा आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. 10 मिनिटं असंच राहू द्या. त्यानंतर नळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 


- बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण नळावर लावा. हे मिश्रण 20 मिनिटे ठेवा, त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. या ट्रिक्सचा वापर केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल.