मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जुनी नाणी आणि नोटा खरेदी -विक्रीचा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेकजण जुन्या नोटा आणि नाणी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे विकत आहेत. या संदर्भात आरबीआयने अलीकडेच यासंदर्भात एक महत्वाची माहिती जारी केली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, काही फसवे लोक ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीसाठी केंद्रीय बँकेचे नाव आणि लोगो वापरत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही जुनी नाणी आणि नोटा विकण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी करत असाल, तर आधी RBI ने दिलेली ही माहिती नक्की तपासा. काही असे लोक आहेत. जे लोकांची ऑनलाईन फसवणूक करतात आणि त्यासाठी ते काही ना काही नवीन मार्ग अवलंबत असतात.


RBI ने ट्विट करून काय म्हटले?


रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले आहे की, काही घटक भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाव आणि लोगो चुकीच्या पद्धतीने वापरत आहेत.


रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'RBI अशा कोणत्याही कार्यात सामील नाही. RBI अशा व्यवहारांसाठी कोणाकडून कधीही कोणतेही शुल्क किंवा कमिशन मागणार नाही. त्याच वेळी, बँकेने असे म्हटले आहे की, त्यांनी अशा उपक्रमांसाठी कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अधिकृतता दिलेली नाही.



आरबीआयचा कोणाशीही करार नाही


RBI बँकेने म्हटले आहे की, “रिझर्व्ह बँकेने कोणत्याही संस्था, कंपनी किंवा व्यक्ती इत्यादींना अशा व्यवहारांवर कोणतेही शुल्क किंवा कमिशन आकारण्याचा अधिकार दिलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँक सामान्य लोकांना अशा बनावट आणि फसव्या ऑफरच्या जाळ्यात न पडण्याचा सल्ला दिला आहे.