Credit Card वापरताय सावधान, कारण....
पिन नंबर शिवाय देखील Credit Cardच्या माध्यमातून व्यवहार करता येणं शक्य आहे.
नवी दिल्ली : आता सध्या अनेक बँका आपल्या ग्राहकांना Credit Cardची सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र Credit Card चा वापर करणं अत्यंत जोखमीचं देखील आहे. अनेक वेळा आपल्याकडून Credit Card हरवल्याची किवा चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. आता तुम्ही म्हणाल शॉपिंग केल्यानंतर पिन टाकल्याशिवाय खरेदी करता येत नाही. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की पिन शिवाय देखील Credit Cardच्या माध्यमातून व्यवहार करता येणं शक्य आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, अनेक आंतरराष्ट्रीय हॉटेल्समध्ये Credit Cardच्या माध्यमातून बिल भरण्यासाठी पिन नंबरची गरज भासत नाही. त्यामुळे कोणीही कोणत्याही समस्याशिवाय परदेशात तुमचा आंतरराष्ट्रीय Credit Card वापरू शकतात.
त्यामुळे Credit Cardचा वापर करताना अत्यंत काळजीने करा. जर का Credit Card हरवले असेल किंवा चोरीला गेले असेल तर सर्वात आधी बँकेला कळवा आणि Credit Card तात्काळ ब्लॉक करा.
Credit Card ब्लॉक करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही कस्टमर केअरला फोन करून Credit Card ब्लॉक करू शकता. SMSद्वारे देखील Credit Card ब्लॉक करता येतो. इन्टरनेट बँकिंगच्या माध्यमातून देखील Credit Card ब्लॉक करता येतो.
महत्त्वाचं म्हणजे Credit Card ब्लॉक केल्यानंतर तात्काळ जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा. एफआयआरची प्रत Credit Card चोरी झाल्याचा पुरावा म्हणून देखील कामी येण्याची शक्यता असते. बँकेकडून पुरावा मागितला असल्यास एफआयआरची प्रत सादर करता येवू शकते.