ATM Card Insurance: जर तुम्ही एटीएम कार्डचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण बँक तुम्हाला 5 लाख रुपये देऊ शकते. मात्र या बाबत अनेक बँक ग्राहकांना माहिती नसते. बँकेने एटीएम कार्ड दिल्यानंतर काही सेवा प्रदान करते. या मोफत सेवांपैकी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे इंश्योरन्स. अनेक लोकांना एटीएमचे नियम माहीत नाहीत. बँक सुद्धा ही माहिती आपल्या ग्राहकांना देत ​​नाही. एटीएम कार्ड जारी करताच ग्राहकाला अपघाती विमा ( Accidental Insurance)मिळतो. यासाठी कार्डहोल्डरच्या कुटुंबियांना अर्ज करणं आवश्यक असतं. जर तुम्ही क्लेम केलं नाही तर काहीच मिळत नाही. जर तुम्हाला 5 लाख रुपयांसाठी क्लेम करायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंश्योरन्स कोणाला मिळतो?


आरबीआयच्या नियमांनुसार, कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेचे एटीएम धारकांना इंश्योरन्स मिळतो. पण ग्राहकाने एटीएम कार्ड किमान 45 दिवसांपूर्वी वापरत असणं आवश्यक आहे. म्हणजेच एटीएम कार्ड हाती मिळाल्यानंतर 45 दिवसानंतर अपघात झाल्यास इंश्योरन्ससाठी क्लेम करु शकतो.  एटीएमच्या इंश्योरन्सवर किती रक्कम मिळेल, हे सर्व एटीएम कार्डच्या श्रेणीवर अवलंबून आहे.


बँक कार्डधारकांना वेगवेगळ्या श्रेणीनुसार इंश्योरन्स देते. कार्ड श्रेणी क्लासिक, प्लॅटिनम आणि सामान्य आहे. सामान्य मास्टरकार्डवर 50,000 रुपये, क्लासिक एटीएम कार्डवर 1 लाख रुपये, व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपये आणि प्लॅटिनम कार्डवर 5 लाख रुपयांचा इंश्योरन्स मिळतो.


एटीएम कार्डहोल्डरचा अपघाती मृत्यू झाल्यास दावा करू शकता


एटीएम कार्ड वापरणाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत इंश्योरन्स उपलब्ध आहे. दुसरीकडे, जर एका हाताला किंवा एका पायाला इजा झाली असेल, तर त्या प्रकरणात 50000 रुपयांपर्यंतची विम्याची रक्कम उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज करावा लागेल. कार्डधारकाच्या नॉमिनीला अर्ज बँकेत जमा करावा लागतो.