New Year Saving Plan: पगार वाढल्यानंतर खर्चदेखील वाढतात. त्यामुळंच पैशांच्या बचतीकडे कानाडोळा केला जातो. देशातील अधिकाधीक तरुणाई खर्च वाढल्यामुळं बचत करु शकलो नाही, अशी कारण देत टाळाटाळ करतात. तसंच, पुढच्या वर्षी पगार वाढल्यानंतर बचत करण्यास सुरुवात करु, असंही सांगतात. मात्र प्रत्यक्षात तसे घडत नाही. पगार कितीही वाढला तरीदेखील बचतीची सवय नसल्यास सेव्हिंग होत नाही. पण बचतीची पुढील भविष्यासाठी खूप फायद्याचे आहे. आज आम्ही तुम्हाला बचतीचा एक सुपर फॉर्मुला सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 हजार पगार असलेल्या नोकरदारांसाठी
तुमचा पगार 20 हजार रुपये महिना असेल तरीदेखील तुम्ही बचत करु शकता. ज्या दिवशी पगार खात्यात जमा होईल तेव्हा लगेचच तुमच्या दुसऱ्या खातात पैसे ट्रान्सफर करा. पण एक लक्षात घ्या की या खात्यातील पैसे कधीही खर्च करुन नका. तुम्हाला सेव्हिंग करणे कठिण जात असेल तर सुरुवातीला तुमच्या पगाराच्या फक्त 10 टक्के भागच बचत करा. म्हणजेच सुरुवातीला 6 महिन्यांपर्यंत 2000 रुपये महिना बचत करा. 


दरम्यान, आजच्या काळात सर्वांना 50,000 रुपयांच्या जवळपास पगार येतो. जर तुमचाही पगार 50 हजारांच्या आसपास असेल तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला किती पैशांची बचत करावी लागेल आणि कुठे गुंतवणुक करावी, हे समजून घेतले पाहिजे. जेणेकरुन भविष्यात मोठ्याप्रमाणात रक्कम गुंतवू शकतात. 


तुमचे लग्न झाले आहे आणि दोन मुलंदेखील आहेत आणि तुमचा पगार 50,000 रुपये आहे तरीदेखील तुम्ही बचत करु शकता. प्रायव्हेट जॉब करणाऱ्यांना दर महिना तुमच्या पगारातून जवळपास 30 टक्के रक्कम बचत केली पाहिजे. नियम सांगतो की, 15 हजार रुपये दर महिन्याला बचत केले पाहिजेत. जर तुमचा पगार 50 हजार रुपये आहे तर प्रत्येक महिन्याला त्यातून 15 हजार रुपये बचत करत असाल तर तुम्हाला गुंतवणुक करणे कठिण जाणार आहे. त्यामुळं याबाबत तुम्ही विचार करणे आवश्यक आहे. 


10 टक्के रक्कम बचत करा


तुम्ही आत्तापासून बचत करण्याचे ठरवत असाल तर सुरुवातीला 10 टक्क्यांपासून सुरुवात करा. त्यानंतर 6 दर महिन्यांनी रक्कम वाढवत जा. जोपर्यंत महिना 30 टक्के रक्कम बचत करत नाहीत तोपर्यंत बचतीचा हाच फॉर्मुला सुरू ठेवा. सुरुवातीला तुम्हाला हे खूप कठिण जाणार आहे. खर्च पूर्ण करु शकणार नाही. यामुळं तुमची अनावश्यक खर्च करण्याची सवयही तुटेल. खर्च कमी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची एक लिस्ट बनवा. त्यानंतर अनावश्यक व चैनीच्या गोष्टींबाबत विचार करा. 


महिन्यात 4 वेळी बाहेर जेवणाची तुमची सवय असेल तर फक्त दोनदाच बाहेर जा. बिनकामाचे खर्च टाळा. त्याबरोबरच, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन शॉपिंग करणेही टाळा. जेव्हा पण बाहेर शॉपिंगसाठी जात असाल तेव्हा घरीच एक लिस्ट बनवून ठेवा. तसंच, बाहेर मिळणाऱ्या ऑफरच्या नादात जास्त पैसे खर्च करु नका. या सगळ्या गोष्टींमुळंच तुम्ही पगारातील 30 टक्के भाग बचत करु शकता. 


तुम्ही हा फॉर्मुला लक्षात ठेवला तर 50 हजार रुपये पगार असलेले लोक 1.80 लाख रुपयांची बचत करु शकता. जेव्हा तुम्ही दर महिन्याला 15 हजार रुपयांची बचत करत अहात तर त्यातील 5 हजार रुपये इमरजन्सी फंड म्हणून ठेवून द्या. तर 5 हजार रुपये मॅच्युअल फंडमध्ये SIP करु शकता. त्याव्यतिरिक्त 5 हजार रुपयांचे रेकरिंग डिपॉजिट किंवा गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुक करु शकता. जेव्हा जेव्हा तुमचा पगार वाढेल तेव्हा गुंतवणूक अशीच वाढवत पाहा. तुम्ही या फॉर्मुल्याने गुंतवणुक करत असाल तर भविष्यात आर्थिक संकट सोसावे लागणार नाही.