नवी दिल्ली : बदलत्या काळानुसार इंटरनेटचा वापर करत शेतीसाहीत्य ऑनलाईन मागविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. यापुढे शेतकऱ्यांना शेतीचे साहित्य घरपोच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी शेतकऱ्यांना विशेष असे अतिरिक्त शुल्कही द्यावे लागणार नाही. जगातील सर्वात मोठी खत विकरक सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इफकोने (IFFCO)ही घोषणा केली आहे.


ई-कॉमर्स प्रणालीद्वारे शेतकऱ्यांनाही मिळणार खते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इफको ही डिजिटल मंच इंडियन को-ऑपरेटीव्ह प्लॅटफॉर्मच्या (आयसीडीपी) माध्यमातून आपली उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. या सेवेअंतर्गत इफको शेतकऱ्यांना पाण्यात विरघळणारी खते. कृषी-रयासनं, जैविक खते, बीयाणे, रोपटी आदी प्रकारचे साहित्य तसेच, शेतीसाठी आवश्यक इतर साहीत्य योग्य वेस्टनात बंद करून घरोपोच पोहोचवणार आहे. ही सर्वच उत्पादनांची पाकिटे ही जास्तीत जास्त पाच किलो वजनापर्यंत असणार आहेत. अनुदान प्राप्त पारंपरीक खते जसे की, यूरिया, डीएपी, एनपीके इत्यादी खतांची विक्री मात्र ऑनलाईन होणार नाही.


ग्रामिण भागात वितरण व्यवस्था मजबूत करणार - इफको 


इफकोचे प्रबंद निदेशक उदय शंकर अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, या सेवेचा उद्देश अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण शेती साहित्य ग्रामीण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. तसेच, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत ई-कॉमर्सचा लाभ पोहोचावा असा आहे. इफको कडून हे पाऊल पहिल्यांदाच उचलले जात आहे. आम्ही प्रामुख्याणे ग्रामिण भागात वितरण व्यवस्था मजबूत करू असेही अवस्थी म्हणाले आहेत.