Artificial Rain Video : जून महिना संपत आला होता तरी वरुणराजाचे आगमन झाले नव्हते. पण शनिवारी सकाळी मुंबईकरांना वरुणराजाने सुखद दिसाला दिला. अखेर मुंबईत पावसाचं आगमन झालं आहे. पण कानपूर शहरात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून क्लाऊड सीडिंगद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोग सुरु होता. शेवटी या प्रयत्नाला यश आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआयटी कानपूरने आकाशातून विमानातून आयआयटी कॅम्पसमध्ये हवेत रासायनिक पावडरचा स्फोट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रयोगामुळे कानपूर आयआटीचं सर्वत्र कौतुक करण्यात येतं आहे. 


2017 पासून चाचणी सुरु... 


आयआयटी कानपूरमध्ये 2017 पासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या चाचणीवर काम सुरु होतं. कोरोनामुळे या प्रयोगाला लागणारी उपकरणं अमेरिकेतून भारतात आणता आली नाही. अखेर ही उपकरणे कानपूर आयआयटी कँम्पसमध्ये पोहोचली त्यानंतर डीजीसीएने चाचणी परवानगी दिली. 2018 मध्ये पहिली चाचणी करण्यात येणार होती पण उपकरण नसल्याने ते शक्य झालं नाही. 


दुष्काळग्रस्त भागांना दिलासा...


अखेर आयआयटी कानपूरने हा प्रयोग यशस्वी करुन दुष्काळग्रस्त भागांना दिलासा दिलाय. दिल्ली, मुंबईसारख्या मेट्रो शहरांला या प्रयोगाचा फायदा होणार आहे.



वायू प्रदूषणापासूनही लोकांची या प्रयोगाद्वारे सुटका करता येऊ शकते. 


असा झाला प्रयोग 


प्रोफेसर महेंद्र अग्रवाल यांनी या चाचणीबद्दल माहिती दिली.  ते म्हणाले की,'' IIT कानपूर हवाई पट्टीवरून उडणारे Ceshna विमान जेव्हा  1 ते 2 किलोमीटर वर जात तेव्हा आकाशात म्हणजे ढगांमध्ये रसायनांचा स्फोट करण्यात आला.



त्यानंतर या रसायनांमुळे ढगातील बीजारोपण तयार होऊन कृत्रिम पाऊस पडतो. हा प्रयोग आयआयटी कानपूर कँम्पसच्या वरती करण्यात आला. ज्यात कानपूर आयआयटीला यश मिळालं आहे. या चाचणी निकालाचं मूल्यांकन करुन आणखी किती चाचणी करावे लागेल ते ठरलं जाईल.''