CCTV VIDEO : बापाचं बोलणं पोराच्या मनाला लागलं, थेट रेल्वे रुळावर जाऊन झोपला अन्...
पालकांनो, मुलांना रागवताय? वाचा ही बातमी...
Viral Video : आई वडिल नेहमी आपल्या मुलांची काळजी करत असतात. ते नेहमी आपल्या भविष्याचा विचार करू उपदेश देतात. मात्र, अनेकदा आई वडिलांच्या निर्णयावरून मतभेद होताना दिसतं. त्यावेळी आई वडिल आपला हक्क दाखवत मुलांना रागावतात देखील. मात्र, त्यावेळी काहींना आई वडिलांचा उपदेश मनाला लागतो. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला आहे. (IIT student lay down on the railway track in firozabad video viral)
आयआयटीमध्ये (IIT Student) शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याचे वडील रागावले. त्याचा एवढा परिणाम त्याच्या मनावर झाला की, त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मन दुखावलं गेल्याने तो थेट रेल्वे रूळावर जाऊन झोपला. फिरोजाबाद रेल्वे स्थानकावर हा सर्व प्रकार घडला आहे. ही संपुर्ण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली (firozabad Railway station video viral).
CCTV मध्ये काय दिसतंय?
रेल्वे रुळावर तरूण झोपलेला (IIT student lay down on the railway track) पाहून घटनास्थळी एकच खळबळ उडाली. रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या जीआरपीचे उपनिरिक्षक संतोष कुमार यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत युवकाला हटवलं. त्याला उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आलं. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली.
वडील म्हणाले, 'पुन्हा तोंड दाखवू नकोस...'
जीआरपीचे (GRP) उपनिरिक्षक संतोष कुमार यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलंय की, तरुणाला वडिलांनी शिवीगाळ केली होती. पुन्हा तोंड दाखवू नका, असंही म्हणाले. यामुळे तरुण नाराज झाला आणि रागाच्या भरात त्याने रेल्वे स्टेशनवर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तरुणाने रेल्वे स्थानक गाठले आणि रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी झोपला. मात्र, त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
दरम्यान, हा तरुण आयटीआयचा (IIT) विद्यार्थी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी विद्यार्थ्याचे त्याच्या वडिलांसोबत काही वाद झाले. यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला शिवीगाळ केल्याने त्याला राग आला आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दुपारी 12 वाजता तो प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील रेल्वे रुळावर झोपला होता.