मुंबई : रहिवासी सोसायट्यांमधील पार्किंगची जागा त्या सोसायटीच्या मालकीची असते. त्यामुळे बिल्डर पार्किंग स्पेसची जागा कोणत्याही सदनिकाधारकाला विकू शकत नाही. बिल्डरने सदनिकाधारकाला पार्किंगची स्पेस विकने हे बेकायदेशीर आहे. याबाबत सदनिका धारकांमध्ये जागृती व्हावी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने मोहिम राबवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोसायटीची जागा बिल्डरला विकता येणार नाही, असा कायदा 1963 मध्येच झाला असून, ही जागा सोसायटीच्या मालकीची असते. पार्किंगच्या जागेसंबधी निर्णय घेण्याचा अधिकार सोसायटीलाच असतात. त्यासाठी किती शुल्क घ्यायचे? जागेचे स्लॉट किती? यासंबधी निर्णय सोसायटीलाच घेण्याच अधिकार आहेत.  बिल्डरचा त्यात कोणताही हस्तक्षेप नसल्याचे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार,  बांधकाम व्यावसायिकाला पार्किंगची जागा सदनिकाधारकाला विकने बेकायदेशीर आहे. आजकाल बिल्डर सदनिका विकताना पार्किंगची जागा विकतात किंवा देऊ असे सांगतात. परंतू हे बेकायदेशीर आहे. हे सोसायटीच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. विशेष म्हणजे ज्या सदनिकाधारकांनी अशा जागेसाठी बिल्डरला पैसे दिले आहेत. ते त्यांना परत मागता येतात. असेही ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.