या फोटोत तुम्हाला किती घोडे दिसत आहेत? हे मजेदार आहे
तुम्ही हा फोटो तुमच्या मित्राला देखील दाखवून त्याला हा प्रश्न विचारु शकता.
मुंबई : कधी-कधी आपल्यासमोर काही वेळा असे फोटो किंवा चित्र येतात, ज्यांना पाहून आपल्याला काही कळत नाही. प्रत्येकाचा वस्तुकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. त्यामुळे लोकांना सारखीच गोष्ट वेगवेगळी दिसते. आपण बऱ्याचदा या संदर्भात खेळ देखील खेळतो आणि आपल्या मित्राला गोष्टी ओळखायला लावतो. आज आम्ही असाच काहीसा फोटो तुमच्यासाठी आणला आहे. जो पाहून तुम्ही देखील काही सेकंद विचार करु लागाल.
तुम्ही हा फोटो तुमच्या मित्राला देखील दाखवून त्याला हा प्रश्न विचारु शकता.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिज्युअल भ्रम व्हायरल होत आहे. यामध्ये घोड्यांचा फोटो आहे. फोटोमध्ये घोड्यांचा समूह बर्फाळ पर्वतांमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. परंतु या फोटोमध्ये दिसणारे घोडे किती आहेत हे तुम्हाला ओळखायचे आहेत.
तुम्हाला या फोटोमध्ये किती घोडे दिसत आहेत, चार, पाच की सात?
किड्स एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थच्या कोडं तज्ञांनी सांगितले की, या चित्रात एकूण सात घोडे आहेत.
चला तर मग हे सात घोडे कुठे आहेत हे शोधून काढूयात. डावीकडे एक घोडा दिसत आहे आणि चार चेहरे मध्यभागी एकत्र दर्शविलेले आहेत. म्हणजे इथे आपल्याला 5 घोडे दिसत आहेत. किड्स एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे की, उरवरीत दोन घोडे उजवीकडे आहेत. तुम्ही जर निट पाहिले तर तुम्हाला उजवीकडे खालच्या बाजूला एक छोटा घोडा उभा आहे आणि त्याच्या वर सातवा घोडा आहे. त्याची पाठ तेथे दिसत आहे.
पिंटो नावाचे हे चित्र बेव्ह डूलिटल या कलाकाराचे आहे. डूलिटलचे म्हणणे आहे की या चित्रात फक्त पाच घोडे आहेत. परंतु तज्ज्ञांच्यामते यात 7 घोडे आहेत. यावरुन आपल्याला हे नक्की सिद्ध होते की, प्रत्येकाच्या दृष्टीवरती सगळं अवलंबून आहे. लोकं एकच गोष्ट वेगळ्या पद्धतीने पाहतात.