Weather Update: आता घेऊयात मान्सूनची  (Monsoon 2022) अपडेट...ऑक्टोबर महिना उजाडला तरी अजून मान्सून माघारी परतला नाही. भारतातील अनेक राज्यांमध्ये अजूनही ढग दाटून येतं आहेत. मान्सूनच्या परतीला उशीर होण्यामागे हवामान खात्याने (IMD) काही कारणे दिली आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने झोडपले  (Heavy Rainfall) आहेत. अशा परिस्थितीत मान्सूनच्या ताज्या सक्रियतेमुळे देशातील कोणत्या राज्यांमध्ये सतत आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (imd weather forecast weather update 2 october nmp)


'ऑक्टोबरमध्येही मान्सून सक्रिय'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 'नूरू' या सुपर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे नैऋत्य मान्सून देशातून माघार घेण्यास विलंब होत आहे. मान्सूनला उशीर झाल्यामुळे तो आता सक्रिय राहणार आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरियाणाच्या काही भागात पावसाची नवीन फेरी सुरू होण्याची शक्यता आहे.


या राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा


हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, 2 ऑक्टोबर  (2nd October)  रोजी आसाम (Assam Rainfall alert)  अंदमान आणि निकोबार (Andaman & Nicobar Islands) बेटांसह मेघालय (Meghalaya)  आणि नागालँड ( Nagaland Rain) , मणिपूर (Manipur) येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मिझोराम  (Mizoram) आणि त्रिपुरा (Tripura) मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


या भागात जास्त धोका


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 'बंगालच्या उपसागरावर ईशान्य दिशेने तयार झालेले चक्रीवादळ मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे, त्यामुळे गंगेच्या मैदानात चांगला पाऊस होईल.' आम्ही तुम्हाला सांगतो की, देशातून मान्सूनची माघार 20 सप्टेंबरपासून सुरू होते, परंतु यावेळी तो 13 ऑक्टोबरपर्यंत थांबेल.


दिल्लीत पावसाचा अंदाज


राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये पुन्हा एकदा लोकांना आर्द्रतेचा सामना करावा लागला आहे. शनिवारी आकाश पूर्णपणे निरभ्र असताना उन्हाच्या झळा पुन्हा एकदा जाणवत होत्या. पुढील दोन दिवस असेच वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यानंतर पुढील आठवड्यात दिल्लीच्या अनेक भागात हलका पाऊस पडू शकतो.