Weather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?
Weather Update: सध्याच्या घडीला कुठंही बाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता हवामानाचा अंदाज घ्या. कारण, मार्च महिन्यामध्ये सूर्य आग ओकणार...
Weather Update: फेबुवारीचा (February Temprature) पहिला पंधरवडा उलटला आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभराहती उन्हाच्या झळांनी अंगाची काहिली केली. ऐन फेब्रुवारीपासूनच तापमान (Temprature) 35 अंशांच्याही पलीकडे गेल्यामुळं नेमकं या एकाएकी वाढलेल्या उन्हाळ्याशी दोन हात करायचे तरी कसे, हाच प्रश्न नागरिकांना पडू लागला. (Maharashtra summer) महाराष्ट्रात ही परिस्थिती असतानाच देशातील ज्या राज्यांमध्ये म्हणजेच राजस्थान (Rajashtah), हिमाचल (Himachal Pradesh) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) हिवाळ्यानं कहर केला होता तिथंही तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये तापमानामध्ये फारसा बदल दिसणार नसून हा उन्हाळा कायम राहणार आहे.
विदर्भात तापमान 37 अंशांवर...
कोकण किनारपट्टी (Konkan) भागावर उन्हाचा दाह वाढत असतानाच विदर्भात (Vidarbha) परिस्थिती फारशी बदललेली नाही. इथं अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 37 अंशावर पोहोचलं आहे. ज्यामुळं उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. हवामान विशेषज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमानाची आकडेवारीही सर्वांसमोर आणली.
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील तापमान
मुंबई - 34 अंश
पुणे- 35 अंश
नाशिक - 34 अंश
नागपूर - 35 अंश
हेसुद्धा वाचा : Skin Tanning : चेहऱ्याचं टॅन घालवता , मग हातापायांच्या टॅनिंगचं काय ?
कोणत्या राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार?
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यातील बहुतांश भागात उष्णता मोठ्या फरकानं वाढेल. राजस्थानमध्ये तापमान 35 अंशांच्या वरच राहील असंही सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये देशातील बहुतांश राज्यांमध्ये तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झाल्याचं लक्षात येईल.
उन्हाळ्यातच बसरणार पाऊसधारा, आरोग्य सांभाळा
स्कायमेटच्या अंदाजानुसार देशाच्या अतीव उत्तरेकडे आणि पूर्वोत्तर भागात येणाऱ्या असणाऱ्या लडाख, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागात पावसाची हजेरी असू शकते. याशिवाय बाल्टिस्तान, मुजफ्फराबादमध्येही पावसाचा शिडकावा पाहायला मिळू शकतो. जम्मू, अंदमान निकोबार, पंजाब, दक्षिण तामिळनाडूमधील काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिमालयाच्या पश्चिमेला असणाऱ्या पर्वतीय भागात हिमवृष्टीही होऊ शकते असं सांगितलं जात आहे.