Imotional Story : मुलगा लक्ष देत नसल्याने एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना काही दिवसांपूर्वी उघडीस आली होती. मुलाकडे तीस कोटी रुपयांची संपत्ती, नातू आयएएस अधिकारी पण वृद्ध आई-वडिलांना दोन वेळचं जेवणही मिळत नव्हतं. अखेर या वृद्ध दाम्पत्याने आपल्या सर्व वेदना एका पत्रात (Suicide Note) लिहित टोकाचं पाऊल उचललं. आता अशीच एक घटना समोर आली आहे. लग्न झालेला मुलगा आपल्या पत्नीसह वेगळा राहिला गेला. घरात वृद्ध आई एकटीच राहात होती. वाईट म्हणजे या मुलाकडे आपल्या आईला भेटायला वेळ नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेचा मृतदेह आढळला
दिल्लीतल्या (Delhi) ग्रेटर नोएड परिसरातील सेक्टर एकमधल्या एका घरात 70 वर्षांच्या अमिया सिन्हा या वृद्ध महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळला. गेल्या अनेक महिन्यांपासून ही महिला घरात एकटी राहात होती. पती खूप आधीच सोडून गेला होता. तर मुलगा लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीसह वेगळा झाला. तब्बल चार महिन्यांनंतर मुलाला आईची आठवण आली. पण भेटायला न जाता त्याने मोबाईलवर फोन केला. पण फोन स्विच ऑफ येत होता. त्यामुळे पत्नीला घेऊन तो आईच्या घरी गेला. पण घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेकवेळा दरवाजा ठोठावूनही उघडत नसल्याने त्याने दरवाजा तोडला. घरात आई निपचित पडलेली दिसली आणि घरात उग्र वास येत होता.


मुलाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानुसार 20 ते 25 दिवसांपूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह मुलाच्या स्वाधिन करण्यात आला. 


डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट
काही दिवसांपूर्वी हरियाणातही अशीच घटना समोर आली आहे. 78 वर्षांचे जगदीश चंद्र आर्य आणि 77 वर्षांच्या भागली देव यांनी सल्फास गोळ्या खात आत्महत्या केली. मृत वृद्ध दाम्पत्य आयएएस विवेक आर्य (IAS Vivek Arya) यांचे आजी-आजोबा आहेत. तर विवेकच्या वडीलांचं नाव वीरेंद्र आर्य असं आहे. हरियाणातल्या चरखी-दादरीमधल्या बाढडा इथली ही घटना आहे. 


मृत वृद्ध दाम्पत्याने लिहिलेलं पत्र भावूक करणारं आहे. 'मी जगदीश चंद्र आर्य. माझा मुलगा वीरेंद्रकडे 30 कोटींची संपत्ती आहे. पण त्याला त्याच्याकडे आम्हाला दोनवेळचं जेवण देण्यासाठी पैसे नाहीत. मी माझ्या लहान मुलाकडे राहात होतो. पण सहा वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर सुनेने वाईट काम करायला सुरुवात केली. त्याला विरोध केला असता तीने मारहाण करुन आम्हाला घराबाहेर काढलं' असं या पत्रात म्हटलं होतं.