नवी दिल्ली : साखरेवरील आयातशुल्क ५० टक्क्यांवरून १०० टक्के करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयानं अर्थ मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यामुळं परदेशातून येणाऱ्या स्वस्त साखरेचा मार्ग बंद होणार आहे.


मात्र, या निर्णयाचा फायदा देशातील ऊस आणि साखर उत्पादकांना होण्याची शक्यता आहे. आयात केलेल्या साखरेमुळे देशांतर्गत उत्पादित केल्या जाणा-या साखरेचे भाव घसरल्याची चर्चा होती. त्याला आळा घालण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयानं यासंदर्भात पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.