LIC पॉलिसी असणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी, कंपनीने दिल्या या सूचना
LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC सध्या IPO साठी तयारी करत आहे.
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने अलीकडेच आपला IPO ड्राफ्ट पेपर (LIC IPO DRHP) SEBI कडे सादर केला आहे. त्याच्या IPOच्या मसुद्याच्या पेपरमध्ये, विमा कंपनीने 30 सप्टेंबर 2021 पर्यंत 21,539.5 कोटी रुपयांची दावा न केलेली रक्कम असल्याचे सांगितले आहे. ही रक्कम अनेक मंत्रालयांच्या बजेट आणि अनेक कंपन्यांच्या बाजार भांडवलापेक्षा जास्त आहे. या कारणास्तव, LIC आता आपल्या पॉलिसीधारकांना दाव्याच्या सुलभ प्रक्रियेसाठी बँक खात्याचे तपशील अपडेट करण्यास सांगत आहे. (Update bank detail to LIC)
तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असल्यास, तुम्हाला माहिती असेल की तुमच्या पॉलिसीचे क्लेम सेटलमेंट पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. अशा परिस्थितीत, पॉलिसीधारकांना त्यांनी विमा कंपनीला योग्य बँक तपशील दिल्याची खात्री करावी लागेल. यामुळे, NEFT द्वारे तुमच्या खात्यात क्लेम सेटलमेंट रक्कम पाठवण्यात एलआयसीला कोणतीही अडचण येणार नाही.
आपल्या नवीन जाहिरातीमध्ये, विमा कंपनीने आपल्या पॉलिसीधारकांना त्यांच्या बँक खात्याचे तपशील अपडेट करण्यास सांगितले आहे जेणेकरून क्लेम प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.
"पॉलिसी धारकांनी कृपया लक्ष द्या: आम्हाला वेळेत क्लेम सेटल करण्यात मदत करा. कृपया मॅच्युरिटी डेट किंवा सर्वाईवल बेनिफिटसाठी तुमचे पॉलिसी दस्तऐवज पाहा. त्यानंतर तपशीलांसह कोणत्याही शाखेशी संपर्क साधा. तुमचे बँक खाते (NEFT) तपशील जमा करा. NEFT आदेश फॉर्म प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. एलआयसी वेबसाइट www.licindia.in वरून देखील डाउनलोड केले जाऊ शकते.''
विमा कंपनीने सांगितले आहे की, एनईएफटी तपशील ऑनलाइन देखील सबमिट केला जाऊ शकतो. क्लेम डिस्चार्ज फॉर्म आणि पॉलिसी डॉक्युमेंट सोबत सबमिट करा. यासह, केवायसी सबमिट करा आणि तुमचा निवासी पत्ता, फोन नंबर / मोबाइल नंबर, ईमेल आयडी इ. अपडेट करा.
LIC सोबतच बँकांकडे देखील 24,356 कोटी रुपयांची Unclaimed रक्कम आहे. यासोबतच शेअर बाजारात कोट्यवधी रुपये आहेत, ज्यावर कोणीही दावा केलेला नाही.