EPFO धारकांसाठी महत्त्वाची बातमी! `हे` काम लवकर करा पूर्ण, 7 लाखांपर्यंत होईल फायदा
EPFO Latest News : EPFO ने आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. ई-नॉमिनेशन केल्याने खातेधारकाच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. यासोबतच यातून 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदाही मिळणार आहे
मुंबई : तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. ई-नॉमिनेशनशिवाय तुम्ही पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकत नाही. यासोबतच तुम्हाला इतर अनेक फायदेही मिळू शकणार नाहीत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे.
ई-नॉमिनेशन अनिवार्य
EPFO खात्यात ई-नामांकन केल्याने खातेधारकाच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. ईपीएफओ नॉमिनीची माहिती देण्यासाठी ई-नॉमिनेशनची सुविधाही देत आहे. यामध्ये ज्यांची नोंदणी झालेली नाही, त्यांना संधी दिली जात आहे. त्यानंतर नॉमिनीचे नाव, जन्मतारीख यासारखी माहिती ऑनलाइन अपडेट केली जाईल.
ईपीएफओने माहिती दिली की ईपीएफ खातेधारकाने ई-नॉमिनेशन करावे. असे केल्याने, खातेदाराचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्ती/कुटुंबातील सदस्यांना पीएफ, पेन्शन आणि विम्याशी संबंधित पैसे काढण्यास मदत होते. यासह, नॉमिनी ऑनलाइन दावा देखील करू शकतात.
आणखी काही फायदे
EPFO सदस्यांना एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत विमा संरक्षणाची सुविधा देखील मिळते. योजनेतील नॉमिनीला कमाल 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. नामनिर्देशन न करता सदस्याचा मृत्यू झाल्यास दाव्याची प्रक्रिया करण्यात अडचणी येतात.
ई-नॉमिनेशन कसे करायचे?
1. EPF/EPS नॉमिनेशन, प्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/ वर जा.
2. सेवा सेक्शनमध्ये FOR EMPLOYEES क्लिक करा आणि सदस्य UAN/ऑनलाइन सेवा (OCS/OTCP) वर क्लिक करा.
3. आता एक नवीन पेज उघडेल तेथे UAN आणि पासवर्ड टाकून लागून करा
4. Manage Tab अंतर्गत E-Nomination असे निवडा. स्क्रीनवर Provide Details टॅब दिसेल, त्यानंतर सेव्ह वर क्लिक करा.
5. आता फॅमिली डिक्लेरेशनसाठी YES वर क्लिक करा, त्यानंतर फॅमिली डिटेल्स Add family detail वर क्लिक करा.
6. एकूण रकमेच्या शेअरसाठी येथे, Nomination Detailsवर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह ईपीएफ नामांकनावर क्लिक करा.
7. आता येथे OTP जनरेट करण्यासाठी E-sign वर क्लिक करा, आता आधारशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका.
8. तुमचे ई-नॉमिनेशनची नोंदणी होईल. यानंतर तुम्हाला कोणतीही हार्ड कॉपी डॉक्युमेंट पाठवण्याची गरज नाही.