पक्का मित्र बनला कट्टर शत्रू! मित्राची केली इतकी निर्घृण हत्या की पोलिसही हादरले
रस्त्याच्या कडेला उभी असलेली कार पाहून पोलिसांना संशय आला, कारमधलं दृश्य पाहून पोलीस हादरले
Crime News : एखादा शत्रूही करणार नाही इतकी निर्घृण हत्या एकाने आपल्या मित्राची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हत्या उघडकीस आली आणि वेळीच आरोपीला अटक करण्यात आली.
असा झाला हत्येचा उलगडा
आरोपीने आधी मित्राच्या डोक्यात गोळी मारली इतक्यावरच तो थांबला नाही. त्याने मित्राचं शीर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर आरोपी पुरावे नष्ट करण्याच्या तयारीमध्ये होते. मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी पाहून संशय आला. गाडीमधली दृश्य पाहून पोलिसही हादरले. गाडीमधील मागच्या सीटवर एका तरूणाचं धड आणि शीर पडलं होतं. मृत तरूणाचं नाव नवीन वर्मा असं होतं.
नेमकं काय आहे प्रकरण-
नवीन वर्मा हा चांदीचा व्यापारी होता. 4 ऑगस्टला दुपारी 3.30 वाजता आरोपी टिंकू भार्गव सोबत बाहेर पडला. दोघेही अॅक्टिव्हा गाडीवर गेले होते. संध्याकाळी नवीनने रात्री आठ वाजता घरी फोन केला होता. त्यावेळी त्याने मी टिंकू भार्गव आणि त्याचा मित्र अनिलसोबत असल्याचं सांगितलं.
एक तासानंतर नवीनच्या घरच्यांनी त्याला फोन लावला तर त्याचा फोन बंद येऊ लागला. काही वेळानंतर नवीनच्या घरी पोलिसांचा फोन येतो. नवीनसोबत काहीतरी घडलं आहे. त्यानंतर नवीनचा भाऊ प्रवीण हा घटनेच्या ठिकाणी जातो. नवीनच्या मृतदेहाची ओळख पटवून घेतो. आरोपींनी नवीनचं शीर त्याच्या शरीरापासून वेगळं केलेलं होतं. त्याच्या डोक्यात गोळीही मारली होती.
असा झाला उलगडा-
पोलीस रात्री गस्त घालत होते, त्यावेळी त्यांना रस्त्याच्या बाजूला एक पांढरी कार संशयास्पद दिसून आली. गाडीबाहेर एक तरूण उभा होता. पोलीस गाडीजवळ गेले तेव्हा त्यांना गाडीमध्ये एक जण बसलेला दिसला तर मागील बाजूला एक धड दिसलं. हा सर्व प्रकार पाहून पोलिसही चक्रावले, त्यांनी टिंकू भार्गव आणि त्याचा साथीदार अनिल यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, टिंकू भार्गव हा भाजपचा अल्पसंख्याकांच्या मोर्चाचा जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना आग्रा येथील सिकंदरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. टिंकू भार्गव याने इतक्या निर्दयीपणे नवीनची हत्या का केली?, याचा तपास पोलीस करत आहेत.