Heart Attack; धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
Rajkot News : आठवी मध्ये शिकणारी रिया नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत पोहोचली होती. यानंतर 7.30 वाजता प्रार्थना करून आठ वाजता ती वर्गात पोहोचली. वर्ग सुरु असतानाच तिला थंडी भरुन आली. ती अचानक बेशुद्ध झाली आणि ती जमीनीवर कोसळली.
Gujrat News : आठ वर्षाच्या मुलीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मुलीच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर राज्य सरकारने शाळा प्रशासनाकडून संपूरण अहवाल मागवण्यात आला आहे. (Class 8 girl in Gujarat's Rajkot dies of heart attack in school).
गुजरातमधील राजकोटमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. मृत मुलीचे नाव रिया असे आहे. रिया राजकोटच्या जसानी स्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होती. शाळेत वर्ग सुरु असतानाच रिया अचानक बेंचवरुन खाली जमीनीवर पडली. यामुळे वर्गात एकच गोंधळ उडाला. वर्गात शिकवणारे शिक्षक धावत रिया जवळ आले. रियाभोवती विद्यार्थ्यांचा गराडा पडला. रियाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
रिया नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत पोहोचली होती. यानंतर 7.30 वाजता प्रार्थना करून आठ वाजता ती वर्गात पोहोचली. वर्ग सुरु असतानाच तिला थंडी भरुन आली. ती अचानक बेशुद्ध झाली आणि ती जमीनीवर कोसळली. थंडीमुळे हृदयविकाराच्या झटक्याने रियाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भारतात अनेक ठिकाणी सध्या थंडीची लाट आली आहे. विद्यार्थांना शाळेत शाळेचा गणवेश घालूनच जावे लागते. मात्र, थंडीपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थी शाळेच्या ड्रेसवर स्वेटर तसेच थंडीपासून बचाव करणारे जॅकेट घालून जातात. मात्र, शाळेच्या गणवेशाव्यतीरीक्त इतर कपडे घालणाऱ्या विद्यार्थ्यांवर अनेक शाळा कारवाई करतात. शाळेतील शिक्षक ओरडतील म्हणून रिया स्वेटर न घालता फक्त शाळेचा गणवेश घालून शाळेत गेली. यामुळे थंडीमुळे रियाचा मृत्यू झाला असून याला शाळा व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. दरम्यान रियाच्या पालकांच्या तक्रारीनंतर सरकारने शाळा व्यवस्थापनाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रांमधील शाळांच्या वेळेत बदल करावा अशी मागणी देखील विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहे.
थंडीत हार्ट अटॅकचा धोका वाढला
कडाक्याच्या थंडीमुळे सध्या हार्ट अटॅक (Heart Attak) आणि ब्रेन स्ट्रोकचा (Stroke Risk) धोका वाढला आहे. हाय कोलेस्ट्रॉल (High Choleterol), हाय तसेच लो ब्लड प्रेशर (High or Low Blood Pressure), थिक ब्लड (Thick Blood) आणि ब्लड क्लॉटिंग (Blood Clotting) या सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक आहे.