Passive Smoking: धुम्रपानामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो... सिगारेटच्या पाकिटावरच धोक्याची सूचना लिहीलेली असते. मात्र, सिगेरटे व्यसन असणारे या धोक्याच्या सुचनेकडे लक्ष देत नाहीत. सिगारेट ओढणे आरोग्यास हानीकारक असताना अनेक जण सिगारेट ओढतात. मात्र, सिगारेट ओढण्याचे हेच व्यसन निरोगी लोकांचा जीव धोक्यात घालत आहे. असाच एक प्रकार हैदराबाद येथे उघडकीस आला आहे. पतीच्या व्यसनामुळे पत्नीचा जीव धोक्यात आला आहे. पतीच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे महिलेला कॅन्सर झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीबीसीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  हैदराबादमध्ये राहणाऱ्या नलिनी सत्यनारायण यांना पतीच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे कॅन्सर झाला. 2010 मध्ये त्यांना आरोग्यविषयी समस्या सुरु झाल्या. त्यांच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. यावेळी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. नलिनी यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला. मेडिकल रिपोर्ट पाहून नलिनी यांना मोठा धक्का बसला. कारण, नलिनी यांनी आयुष्यात कधीच तंबाखुचे व्यसन केले नव्हते. यावेळी पतीच्या चुकीच्या सवयींमुळे त्या या भयानक रोगाच्या शिकार झाल्याचे समजले. 


पतीच्या सिगारेट ओढण्यामुळे झाला कॅन्सर


नलिनी यांना कोणतेही व्यसन नव्हते. मात्र, पतीच्या सिगारेट ओढण्याच्या व्यसनामुळे त्यांना  कॅन्सर झाला आहे. नलिनी यांच्या लग्नाला 33 वर्ष झाली आहेत. त्यांचे पती हे चैन स्मोकर आहेत. ते घरातच नलिनी यांच्यासमोरच सिगारेट ओढत असतात. नलिनी यांचे पती स्मोक करताना सिगारेटचा धुर नलिणी यांच्या शरीरात जात होता. या धुरामुळे त्यांची फुफ्फुसे खराब होवून त नलिनी यांना  कॅन्सर झाल्याचे समजते. 


तंबाखुच्या व्यसनामुळे वर्षाला 8 लाख लोकांना कॅन्सर होतो


जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, तंबाखूच्या सेवनामुळे वर्षभरात तब्बल 8 लाख लोकांचा कॅन्समुळे मृत्यू होतो. तर, अप्रत्यक्षपणे तंबाखूच्या सेवनाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जवळपास 12 लाखाच्या आसपास आहे. सिगारेट ओढणाऱ्यांच्या सहवासात राहणारे देखील कॅन्सरच्या विळख्यात सापडत आहेत. भारतात तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याचे प्रवाण सर्वाधिक आहे.  WHO च्या अहवालानुसार भारतात तंबाखूच्या सेवनामुळे 13.5 लाखांपेक्षा अदिक लोकांचा मृत्यू होतो. 


तंबाखुचे व्यसन असणाऱ्यांमध्ये घट


जगभरात कॅन्सर रोगाविषयी जनजागृती केली जात आहे. यामुळे तंबाखुचे व्यसन असणाऱ्यांमध्ये घट झाल्याचे देखील आकडेवारीवरु दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार  2000 ते 2020 या वर्षाच्या आकडेवारीसह तुलना केल्यास तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 2000 मध्ये 15 वर्षांवरील सुमारे 32 टक्के लोक तंबाखूचे सेवन करत होते. तर, 2020 मध्ये ही संख्या 20 टक्क्यांवर घसरली आहे.