मध्यप्रदेश : चोरट्यांनी विशेष करुन सोनसाखळी चोरही आता अपडेट झालेत. आतापर्यंत सोनसाखळी चोर बाईकवरुन वेगात येत चैन ओढून पोबारा केल्याचा प्रकार तुम्हाला माहिती असेल. पण आता चैन चोरांनी नवीन  पद्धत शोधून काढलीय. तुम्हाला कोणी रस्त्यात कोणी, "काका नमस्कार" म्हणत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण एका तरुणाने काहीशा अशाच पद्धतीने चैन लंपास केलीय. यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनीही तक्रार मिळताच त्या चोरट्याला चैन विकताना रंगेहात अटक केली. (In Jabalpur police arrested a gold chain snatcher thief) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय झालं?  


झालं असं की, काका नमस्कार असं म्हणत एका तरुणाने अभिषेक गुप्ता यांचे पदस्पर्श केलं. पाया पडल्यानंतर त्याने  गळाभेट घेतली.  गळाभेट घेताच त्याने डाव साधला. गळ्यात असलेली सोन्याची चैन त्याने खेचली अन् फरार झाला. या चैनीची किंमत ही साडे तीन लाख इतकी होती. मात्र गुप्ता यांनी वेळीच घडलेल्या सर्व प्रकारची माहिती ही पोलिसांनी दिली. पोलिसांनीही त्तपरता दाखवली. 


हा चोरटा चैन लंपास केल्यानंतर पसार झाला. त्यानंतर त्याने चैन विकण्यासाठी थेट ज्वेलर्सचं दुकान गाठलं अन् इथंच गेम झाला. पोलिसांनी या चोरट्याला चैन विकताना रंगेहाथ अटक केली. त्यामुळे ही चैन परत मिळाली. त्यामुळे तुमच्या सोबतही जर असंच काही झालं असेल, तर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला विसरु नका.