हवामानातील सततच्या बदलामुळे देशात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत नाही. स्वाइन फ्लूया गंभीर आजाराने गत आठवड्यात देशातील एकूण 75 जणांचा बळी घेतला आहे. त्याचप्रमाणे यावर्षी स्वइन फ्लूया विषारी विषाणूमुणे तब्बल 605 रूग्ण मरण पावल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जारी केली आहे. स्वाइन फ्लूवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. यासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती केली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्तानमध्ये स्वाइन फ्लूचे रूग्ण सर्वाधीक असल्याचे समोर येत आहे. राजस्थानमध्ये तब्बल 4,551 स्वाइन फ्लूचे रूग्ण आढळले आहेत. राज्यात एकुण 162 रूग्णांचा या विषाणूने बळी घेतला. गुजरातमध्ये 118 रूग्ण मरण पावले आहेत. राज्यात एकुण 3,969 नागरिकांना रोगाची लागन झाली. दिल्लीमध्ये मागील तीन आठवड्यात स्वाइन फ्लूचे 870 रूग्ण आढळले आहेत त्याचप्रमाणे वर्षभरात 2,835 जणांना विषारी विषाणूची लागन झाली. 


आरेग्यसेवा महानिदेशालय द्वारा सोमवारी जारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात स्वाइन फ्लूया आजाराने दिल्लीत 6 जणांचा बळी घेतला. मध्यप्रदेशात स्वाइन फ्लूने 71 जणांचा बळी घेतला तर 357 रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात स्वाइन फ्लूने 52 जणांचा बळी घेतला असून 675 रूग्ण आढळले आहेत. हिमाचल प्रदेशात या रोगामुळे 34 जणांचा बळी घेतला आणि 298 रूग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूचा आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाद्वारे सतर्कता बाळगली जात आहे.