Viral News : लग्न सोहळ्या धुमधडाक्यात आणि अविस्मरणीय व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तर, आपल्या लेकीच्या लग्नात कशाचीही कमी पडू नये यासाठी मुलींचे वडिल अजिबात मागे पुढे पाहत नाहीत. राजस्थानमध्ये एका पित्याने आपल्या  लेकीच्या लग्नात इतका पैसा खर्च केला आहे की सगळेच जण शॉक झाले आहे.  8 लाखांची FD, 112 किलोचे दागिने, चांदीचा बेड, कार, बगंला अगदी कशाचीच कमी पडू दिली नाही. यामुळे या पित्याने आपल्या मुलीला लग्नात भेट म्हणून दिलेल्या वस्तुंची देखील जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान हे सध्या सेलिब्रेटी वेडिंग डेस्टिनेशन ठरत आहे. अनेक सेलिब्रिटी रास्थानमध्ये शाही विवाह सोहळा करत आहेत. आता हेच राजस्थान पुन्हा चर्चेत आले आहे  तर कोणत्या सेलिब्रिटीच्या लग्नामुळे नाही तर आगळ्या वेगळ्या शाही विवाह सोहळ्यामुळे. राजस्थानमधील जैतरण परिसरातील मोहराई गावात हा शाही विवाह सोहळा पार पडला. व्यापारी महेंद्र सिंह सेवाड यांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत पसरली. 


वऱ्हाडींची राहण्याची सोय अलिशान रिसॉर्टमध्ये


22 फेब्रुवारी रोजी पाली जिल्ह्यातील जैतरणमधील मोहराई येथे हा शाही विवाह सोहळा पार पडला. महेंद्र सिंह सेवाड यांची मुलगी वंशिका हिच्या लग्न सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली. भैसाना गावचा रहिवासी असलेल्या कुलदीप सिंग जगरवाल याच्याशी वंशिकाचे लग्न झाले. कुलदीप देखील एक बडा व्यापारी आहे. महेंद्रसिंग सेवाड हे बेंगळुरूमध्ये जमीन विक्रीचा व्यवसाय करतात. यासोबतच पाईप बनवण्याचे अनेक कारखाने आहेत. या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडींची राहण्याची सोय अलिशान रिसॉर्टमध्ये करण्यात आली होती. जेवणात इतके मेन्यू होते पदार्थ पाहूनच वऱ्हाडींचे मन तृप्त झाले.


हत्ती, उंट, घोडे, बैलगाड्यांसह विंटेज कारमधून वरात


या लग्नाची वरात 10 किलीमीटर पर्यंत पहायला मिळाली.  हत्ती, उंट, घोडे, बैलगाड्यांसह विंटेज कार यांचा वरातीमध्ये समावेश होता. या शिवाय जयपूर, पंजाब आणि नाशिक येथील खास बँड पथक बोलावण्यात आले होते. आज पर्यंत लग्नाची अशी वरात कुणीच पाहिली नसेल. 


मुलीच्या लग्नात दिल्या कोट्यावधीच्या भेटवस्तू


महेंद्र सिंह यांनी आपल्या मुलीला 2 किलो सोने आणि 100 किलो चांदीचे दागिने भेट म्हणून दिले आहेत. नवरी मुलीने भरपूर दागिने परिधान केले होते. यासह चांदीचा पलंग आणि सोफा, तसेच चांदीची भांडी, SUV कार आणि स्कूटी तसेच बंगला लेकीला भेट म्हणून दिला आहे. इतकचं नाही तर बेंगळुरूमध्ये कारखाना, प्लॉट, पालीमध्ये 2 एकर जमीन आणि 1 कोटी 8 लाख रुपयांची एफडी देखील आपल्या मुलीला लग्नात दिली आहे. अजूनही लहान मोठ्या लोखा रुपयांच्या वस्तुंची तर मोजदादच नाही. लेकीच्या लग्नात पित्याचीही दौलत जादा पाहून सगळेच चक्रावले आहेत.