धोलापूर :  राजस्थानच्या धोलपूर जिल्ह्यात बसेडी पोलीस स्टेशन परिसरात मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विवाहितेने आपल्या नवऱ्यावर गंभीर आरोप लावले आहेत.  पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेल्या तक्रारीत नवरा स्वतःच्या डोळ्यासमोर इतरांकडून आपल्यावर अत्याचार करवून घेत असल्याचे म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढेच नाही तर, पोलीस स्टेशनमध्ये नमूद करण्यात आलेल्या तक्रारीत, विवाहितेच्या गुप्तांगांमध्ये तिखट आणि झंडू बाम लावून बेशुद्ध करण्यात आले. विवाहित महिलेने याची माहिती आपल्या माहेरच्यांना दिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठले. आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.


बसेडी परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय महिलेने सांगितले की, तिचे लग्न 14 जानेवारी 2021 ला झाले. लग्नानंतर माहेरून हुंडा आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. त्याकरता तिला मारझोड करण्यात आली. हुंड्याची डिमांड पुर्ण न झाल्याने नवऱ्यासोबतच सासरच्यांनी तिला मारझोड केली.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी रात्री तिच्या नवऱ्यासोबत एक अनोळखी पुरूष तिच्या घरी आला. नवऱ्यासमोर त्या व्यक्तीने तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवऱ्या सोबत आणखी काही जण आले. त्यांनी देखील पीडितेवर अत्याचार केले. 


नवऱ्याची हैवानियत ऐकून कुटूंबियांना मोठा धक्का बसला. विवाहितेचे आईवडील सासरी पोहचे. मुलीची हालत पाहून आई वडीलांच्या पायाखालून जमीन सरकली.  त्यांनी विवाहितेला पोलीस स्टेशनमध्ये नेले. तेथे सर्व तक्रार नोंदवली.