बेहरामपूर (ओडिशा) : शाळेच्या वेळेमध्ये असा एक तास असावा ज्यामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काही असेल? असे अनेक मुलांना वाटत असत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांचे हे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. कारण शाळांमध्ये आता 'शून्य तास' राबविण्याचा निर्णय ओडिशातील गंजम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.


इथल्या ४ हजार शाळांपैकी ३५० शाळांमध्ये सध्या 'शून्य तास' सुरू होत आहे.


'शून्य तास'


 मुलांमध्ये सर्जनशीलता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागण्यासाठी प्रोत्साहन म्हणून राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागान घेतला आहे.


यामध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. 


कसा असणार तास 


या तासात नेहमीची पाठ्यापुस्तके बाहेर काढायची नाहीत. तर आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण, विश्लेषण त्यावर आपले मत मांडावे लागणार असल्याचे  जिल्हा शिक्षण अधिकारी सनातन पांडा यांनी सांगितले.