मुंबई : Birds collided with the glass building : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या काचा पक्षांसाठी किती धोकादायक आहे, हे एका  घटनेवरुन दिसून येत आहे. सूरत येथे एक इमारत पक्षांच्या जीवावर उठली आहे. तुम्हाला खरं वाटत नाही ना!, पण हे खरं आहे. इमारतीच्या भींतीला काचा लावण्यात आल्या आहेत. याच काचा पक्षांसाठी घातक ठरल्या आहेत. या कांचावर धडक बसून जवळपास 34 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगितले जात आहे की, इमारतीवर लावण्यात आलेल्या काचांमुळे आकाशाचे रिफ्लेक्शन पडलेले दिसत आहे. हे आकाश समजून पक्षी उडत असताना त्याकडे आकर्षित झाले ते काचांवर धडकलेत. त्यानंतर पक्षी जमिनीवर खाली पडले. या दुर्घटनेत जवळपास 34 पक्षी जखमी होऊन मृत्यू पावलेत.


सूरत नागरिक बँकेच्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये 34 पक्षी एकाच वेळी वरुन पडताना दिसत आहेत. असे मानले जाते की इमारतीवर काचा होत्या, ज्यामध्ये आकाशाचे प्रतिबिंब दिसत होते.आकाशाचा विचार करता, पक्षी वेगाने काचेवर धडकले असतील, असे सांगितले जात आहे.