राजधानीत कोरोनाचं तांडव! एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद
राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला आहे. आजपर्यंतचे सर्वाधिक रुग्ण एका दिवसात सापडले आहेत. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीत 19 हजार 486 ( जवळपास 20 हजार) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 141 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिल्लीत पहिल्यांदाच एव्हढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात पॉझिटिव्ह रेट 20 टक्के होता. एक्टिव केसेस देखील 61 हजाराच्या पार गेले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येत दिल्लीचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर गेला आहे.
महाराष्ट्रात एका दिवसात 63 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात दिल्ली आणि महाराष्ट्राची सर्वात भयावह परिस्थिती समोर आली आहे. देशभरात एका दिवसात 2 लाख 17 हजार नव्या कोव्हिड रुग्णांची नोंद झाली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखाच्या पार गेली आहे.
महाराष्ट्रात 398 कोरोनाबाधितांचा मृ्त्यू
कोरोनाचा कहर खूप वाढत असताना आज महाराष्ट्रात ६३,७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर राज्यात आज ३९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोग शाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४(१५.८९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचा धोका देशभरात वाढत आहे. संचारबंदी करूनही नागरिक नियम मोडताना दिसत आहेत.
राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचं चित्र आहे. कोरोनाबाधितांना बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे. या संदर्भात आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न आणि प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
६ लाख २० हजारच्या वर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रेमडेसेवीरचा आणखी २ ते ३ दिवस तुटवडा जाणार आहे. पुरवठा सुरळीत होण्याकरता आणखी 2-3 दिवस लागणार असल्याची माहिती राजेंद्र शिंगणेंनी दिली आहे. आता या कंपन्यांच्या सीईओ आणि एमडी यांच्याबरोबर बैठक झाली आहे. ३७ ते ३८ हजार दिवसाला पुरवठा होतो, तो वाढवला जाणार आहे. १९ एप्रिल -२० एप्रिल नंतर पुरवठा सुरळीत होईल, अशी देखील माहिती मिळाली आहे.