मुंबई : देशात  कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी २४ मार्च पासून भरतात लॉकडाऊन लागू करण्यात आला. तरी देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याच्या मार्गावर नाही. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता ६२ हजार ९३९ वर  पोहोचली आहे. तर दुसरीकडे तब्बल २ हजार १०९ भारतीयांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे आता या कठीण प्रसंगी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होणे अत्यंत गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २४ तासांत भारतात ३ हजार २७७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १२७ जणांचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १ हजार ५११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सांगायचं झालं तर सध्या ४१ हजार ४७२ रुग्णांवर उपचार सुरू असून १९ हजार ३५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 



महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २० हजार २२८ रुग्ण आढळले आहेत. तर ७७९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ७ हजार ७९६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 


याशिवाय, मध्य प्रदेशमध्ये ३ हजार ६१४, उत्तर प्रदेशमध्ये ३ हजार ३७३, तेलंगाणामध्ये १ हजार १६३, राजस्थानमध्ये ३ हजार ७०८, झारखंडमध्ये १५७, हरियाणामध्ये ६७५, बिहार ५९१, जम्मू काश्मीर ८३६, पंजाब १ हजार ७६२, केरळ ५०५, उत्तराखंडमध्ये  ६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.