श्रीनगर : गेल्या ४८ तासांत भारतीय लष्कराचे ५ तर बीएसएफचे १ जवान जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झाले. मध्य आणि उत्तर काश्मीरच्या विविध घटनात १० जणांचा बळी गेलाय. त्यात पाच जण लष्कराचे जवान आहेत. तर एक बीएसएफ जवान. मछील सेक्टरवर फॉर्वर्ड पोस्टवर हिमस्खलनात लष्कराचे चार जवान बर्फाखाली गाडले गेले. त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरेश आणि रामपूर सेक्टरमध्येही हिमस्खलन झालं. मात्र यात जीवितहानी झाली नाही. तर नौगाम सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात एक बीएसएफ जवान शहीद झाले. गंधरबाल जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात ५ नागरिक ठार झाले.



सुरेश चित्ते शहीद


ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे भारतीय लष्करात सियाचीनमध्ये तैनात असलेले जवान सुरेश चित्ते शहीद झाले आहेत. सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना चित्ते यांना वीरमरण आलं. सुरेश चित्ते हे मूळचे औसा तालुक्यातल्या आलमचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई आणि एक लहान भाऊ आहे.