अहमदाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपा अध्यक्ष अमित शहा आज गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून गांधीनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना एनडीए घटकपक्षांचे नेतेही उपस्थित असणार आहेत. उद्धव ठाकरे अहमदाबादमध्ये दाखल झाले असून अमित शहांच्या रॅलीत होणार सहभागी होणार आहेत. अमित शहा एनडीए नेत्यांसह शक्तिप्रदर्शन करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपा अध्यक्ष अमित शहा अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपाचे सर्व प्रमुख नेते, तसेच एनडीए नेते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अमित शहा यांच्या या शक्तिप्रदर्शनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी या शक्तिप्रदर्शनाला उपस्थित असतील. 



त्याशिवाय अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवानही उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. अमित शहा यांचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले. अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे जाणार असल्यामुळे आतापर्यंत युतीमधील सर्वाधिक घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याचे मानले जात आहे.