मुंबई : रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने नुकताच आपला वार्षिक अहवाल सादर केलायं. यानुसार नोटबंदीनंतर ९९.३ टक्के करंसी परत आली आहे. हा रिपोर्ट येण्याच्या दुसऱ्यादिवशीच वडोदराच्या मालसर गावात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा नर्मदा नदी पात्रात सापडल्या. नदीत नोटा असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांची एकच गर्दी झाली. पण या नोटा खोट्या असल्याचे लोकांच्या नंतर लक्षात आलं.


लोकांची गर्दी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालसर गावातील काही स्थानिक लोक नर्मदा नदीत आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा त्यांना दिसल्या. मोठ्या प्रमाणात या नोटा पाहून स्थानिक हैराण झाले. हे दिसताच नोट काढण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली.


पोलिसांना माहिती 


 लोक पाण्यात उडी मारू लागले. यावेळी रमण नावाच्या मच्छीमाराने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी वेळीच पोहोचून हस्तक्षेप केला. याठिकाणावरून पोलिसांनी एक हजार रुपयाच्या ३६ तर पाचशे रुपयांच्या २ नोटा सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केलाय.