Uttar Pradesh Crime News : पोस्टमार्टम करणार इतक्यात मृत तरुणी जिवंत झाली आहे. उत्तर प्रदेशात ही आश्चर्यकारक  घटना घडली आहे. मृत्यू झाल्याचे समजून पोलिस या तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी नेत होते. यावेळी तरुणीच्या कुटुंबियांनी फॅमिला डॉक्टरना बोलावले. यावेळी आश्चर्य घडले. तरुणीच्या कुटुंबियांना देखील या प्रकाराचा मोठा धक्का बसला. 


काय घडल नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणी  कालव्यात तरंगत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या तरुणीला पाण्याबाहेर काढले. या तरुणीच्या कुटुंबिय देखील घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ या तरुणीची ओळख पटली. तरुणीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले. यानंतर पोलिसांनी या तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेण्यासाठी तयारी सुरु केली.


तरुणी जिवंत होती


मृत्यू झाल्याचे जाहीर करत पोलिस या तरुणीचा मृतदेह रुग्णालयात नेत होते. यावेळी तरुणीच्या कुटुंबियांनी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेण्याची मागणी पोलिसांकडे केली. त्यानुसार फॅमिली डॉक्टरांनी या तरुणीची तपासणी केली असता तिचे हार्टबिट सुरु असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी त्वरीत या मुलीवर उपचार सुरु केले.


नातेवाईक करत होते अत्यंसस्काराची तयारी


या तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या सर्व नातेवाईंकाना समजली. त्यानुसार सर्व नातेवाईक घरी अत्यंसस्काराची तयारी करत होते. याचवेळी ही तरुणी असल्याचे समजले. यामुळे तरुणीच्या कुटुंबियांसह ग्रामस्थ देखील अचंबित झाले. घरात स्मशान शांतता पसरली असताना तरुणी जिवंत असल्याचे समजताच सगळे आनंदित झाले. 


पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप


तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केले आहेत. मृत झाल्याची शहनिशा न करता पोलिस या तरुणीचे पोस्टमार्टेम करणार होते. पण, कुटुंबियांनी पोस्टमार्टेमपूर्वी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. यामुळे आमची मुलगी जिवंत आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला आमची मुलगी गमावावी लागली असती असा संताप कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. 


तरुणी मनोरुग्ण


ही तरुणी मनोरुग्ण असल्याचे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. बऱ्याचदा ती घरातून निघून जाते. आता देखील ती घरातून निघून गेली होती. दोन ते तीन तास ती गायब होती. अचानक ती कालव्यात पडल्याची माहिती ग्रामस्थांनी तिच्या कुटुंबियांना दिली. पोलिसांनी तरुणीवर योग्य उपचार करण्याचा सल्ला तिच्या कुटुंबियांना दिला आहे.