गाडीत बसलेल्या नववधूने केलं असं काम, पाहून सगळेच थक्कं... पाहा व्हायरल व्हिडीओ
हा व्हिडीओ हे दाखवून देतो की, ही आजच्या काळातील पिढी आहे, जी स्वत: रडणारी नाही, तर दुसऱ्यांना रडवणारी आहे.
मुंबई : सोशल मीडिया हे वेगवेगळ्या कन्टेन्टने भरलेलं आहे. येथे तुम्हाला प्रत्यक कन्टेन्ट आधी पाहिलेल्या कन्टेन्टपेक्षा वेगळा आणि जास्त मनोरंजक वाटतो. म्हणून तर लोकं कितीही वाटलं तरी, सोशल मीडियापासून लांब राहात नाहीत. लोकांना असं सारखं वाटतं असतं की, आपण सोशल मीडियापासून लांब राहू तर आपण बरंच काही मिस करु. ज्यामुळे लोकं देखीस सारखं सारखं येथे अपडेट्स पाहात असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो तुम्हाल पाहायला नक्की आवडेल. हा व्हिडीओ हे दाखवून देतो की, ही आजच्या काळातील पिढी आहे, जी स्वत: रडणारी नाही, तर दुसऱ्यांना रडवणारी आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका नववधूचा आहे आणि या नववधूची लग्नानंतर विदाई होत असते. परंतु तेव्हा असं काही घडतं, ज्याची लोकांना अपेक्षाच नसते.
विदाईनंतर मुलगी आपली माहेरची मंडळी, तसेच आपल्या नातेवाईकांना सोडून जाते आणि या भावनेने नववधूच्या डोळ्यात पाणी येतं. परंतु आता काळ बदलला आहे. आजच्या तरुणी विदाईच्या वेळी रडत नाही तर हसत आणि नाचत आपल्या सासरी जातात.
व्हिडीओमधील तरुणी देखील हेच करत आहे. ती आपल्या विदाईच्यावेळी न रडता, उलट ती कारमध्ये नाचत आहे आणि मनसोक्त आनंद लूटत आहे. ज्यामुळे लोकांना देखील हा व्हिडीओ खूपच आवडला आहे.
सुरुवातीला ही नववधू पदराने तोंड झाकून नाचत असते, परंतु नंतर ती आपला पदर तोंडावरुन काढते. ही नववधू ज्यापद्धतीने नाचत आहे. तिची शैली लोकांना फार आवडली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ bridal_lehenga_designn नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला लोक खूपच पसंती दर्शवत आहेत.