नवी दिल्ली : Hero Motocorp : हीरो मोटोकॉर्पबद्दल (Hero Motocorp) मोठी बातमी हाती आली आहे. 'हिरो मोटो'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आयकर विभागाचे छापे टाकलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवन मुंजाल यांच्या दिल्ली, गुडगावातील आस्थापनांवर ही छाप्याची कारवाई सुरू आहे. नकली बिले वापरून करचोरी केल्याचा आरोप मुंजाल यांच्यावर आहे. त्याआधारे ही कारवाई करण्यात आलीये. याबाबत 'झी 24 तास'ने कंपनीची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या छाप्यांबाबत काहीही बोलण्यास हिरो मोटो कॉर्पने नकार दिला आहे. 


 बुधवारी हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासून त्यांच्या गुडगाव येथील घर आणि कार्यालयात चौकशी सुरू आहे


पवन मुंजाल यांच्यावर आरोप आहे की त्यांनी त्यांच्या खात्यात बोगस खर्च दाखवला आहे. याबाबत प्राप्तिकर विभाग सकाळपासून छापे टाकत आहे. आयकर पथकाला मिळालेल्या संशयास्पद खर्चाच्या तपशिलांमध्ये काही इन-हाउस कंपन्यांचे खर्चही दाखवण्यात आले आहेत. हा छापा आत्तापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. सध्या आयकर विभाग किंवा हिरो मोटोकॉर्पकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.