Income Tax Notice Issue: देशात अनेकदा इनकम टॅक्ससंबधी अडचणी सोडवणे म्हणजे टॅक्स पेयर्सच्या डोक्याला चांगलाच ताप असतो. अनेकदा ही प्रकरणं इतकी किचकट असतात की ही सोडवण्यासाठी त्यांना सीए किंवा फायनान्शियल प्रोफेशनलची मदत घेण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा तर असं होतं की जितक्या रक्कमेसाठी टॅक्स भरण्याची नोटीस आलीय त्यापेक्षा जास्त खर्च ती समजण्यासाठी आणि ते प्रकरण सोडवण्यासाठी येतो. तुमच्या ओळखीतही असे अनेक किस्से असतील. दरम्यान दिल्लीतील एका टॅक्स पेयर्सला अशा घटनेमुळे डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीचे अपूर्व जैन यांच्यासोबत एक अजब प्रकार घडला. त्यांना या घटनेचा इतका धक्का बसला की त्यांनी आपली वेदना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलीय. अपूर्व यांनी एक केस सोडवण्यासाठी आपल्या चार्टड अकाऊंटंट आणि टॅक्स डेप्यूटीला 50 हजार रुपयांचं पेमेंट केलं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा वाद केवळ 1 रुपयांचा होता. 


जैन यांनी आपली निराश सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त केली. मी या प्रकरणातील गांभीर्यावर जोर देऊ इच्छितो. मी मस्करी करत नाहीय. हे सर्व 1 रुपयासाठी झालंय. असे अपूर्व आपल्या ट्वीटरवर सांगतात. 


काय आहे पोस्ट?



शिक्षण 10 वी पास, रेल्वे स्टेशनवर झोपायची वेळ; नुवाल यांनी 1 हजार गुंतवून उभारली 92000 कोटींची कंपनी!



या घटनेमुळे भारतातील इनकम टॅक्स यंत्रणा किती किचकट आहे, हे दिसून आले आहे. येथे किरकोळ कारणांसाठी लोकांना मोठी रक्कम चुकवावी लागते. जैन यांच्या पोस्टवर सोशल मीडियातून मिक्स कमेंट्स आल्या आहेत. काहींनी इनकम टॅक्स डिपार्टमेंच्या क्षमतेवर अविश्वास व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत.


सोशल मीडियात विविध प्रतिक्रिया 



एका यूजरने लिहिलंय की, इनकम टॅक्स विभागाची हालत अशी झालीय की आता काहीच मस्करी वाटत नाही.' 'जेव्हा इनकम टॅक्स डिपार्टमेंट श्रीमंत शेतकऱ्यांना नोटीस पाठवेल, त्या दिवसाची मी वाट पाहतोय', अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली. तर 50 हजाराची फी खूपच जास्त आहे.आजकाल सीए कितीपण चार्ज करतात, अशी कमेंटही एकाने केलीय.


आयकर विभागाचा इशारा


या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने टॅक्सपेयर्सना एक नोटीस जाहीर करुन इशारा दिला आहे. सवलत आणि कपातीसाठी खोटे दावे करुन आयकर रिटर्न फाइल करणाऱ्यांना हे निर्देश आहेत. या प्रकरणातील गांभीर्य आयकर विभागाने अधोरेखित केले आहे. यामध्ये आरोप सिद्ध झाल्यास दंड आणि तुरुंगवासदेखील होऊ शकतो,याची आठवण करुन देण्यात आलीय.


पंतप्रधान मोदी की मनमोहन सिंग? कोणाच्या सरकारमध्ये मिळाल्या जास्त नोकऱ्या? SBI रिपोर्ट आला समोर