Income Tax Return : 2022 वर्ष संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे वर्षाच्या शेवटी उरलेली सर्व कामे करण्यासाठी तुमच्या हातात काहीच दिवस आहेत. अशातच आर्थिक वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची संधी तुमच्याकडून चुकली असली तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयकर विभागाची इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. पण अनेकांना आयटीआर भरता येऊ शकला नाही. जर तुम्हीसुद्धा त्या अनेकांमध्ये असाल तर तुम्हाला आता 31 डिसेंबर पर्यंत (Last Date for ITR) विवरण पत्र  शेवटची संधी असणार आहे. पण त्यासोबत तुम्हाला दंडही भरावा (Bilted ITR) लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागाकडून वारंवार प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यासंदर्भात आठवण करु दिली जात असली तरी अनेकांकडून काही कारणास्तव तो भरला जात नाही. पण आता अशा लोकांसाठीही आयकर विभागाने दंडाच्या माध्यमातून करदात्यांना ही विवरण पत्र भरण्याची संधी दिली आहे.


कसा भरू शकता आयटीआर?


आयकर कायद्याच्या कलम 139(1) अंतर्गत निर्धारित वेळेपर्यंत आयटीआर दाखल करण्यात अयशस्वी झाल्यास कलम 234A अंतर्गत दंड आकारला जातो. जर तुम्हाला  31 डिसेंबर 2022 पर्यंत आयटीआर भरायचा असेल तर तो 5,000 रुपयांच्या दंडासह भरता येईल. तर करदात्याचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याला फक्त 1,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. जर उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असेल तर दंड न भरता विवरणपत्र भरता येईल.


जर आययीआर भरताना काही चूक झाली असेल तर 'रिटर्न फाइल अंतर्गत' तुम्ही आयटीआर पुन्हा भरू शकता. यासाठी तुम्हाला रिटर्न फाइल अंतर्गत 'सेक्शन 139(5) अंतर्गत ते सुधारित करण्याचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर आधीच्या आयटीआरचे तपशील, पावती क्रमांक, मूळ आयकर रिटर्न भरण्याची तारीख इत्यादी माहिती भरावी लागेल. याप्रकारे तुम्ही आर्थिक वर्ष 2021-22 साठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत सुधारित आयटीआरही भरू शकता.


जर तुम्ही 31 डिसेंबर 2022 पर्यंतही आयटीआर भरला नाहीत तर आयकर विभागाकडून तुम्हाला नोटीसही येऊ शकते. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर भरु शकता.


आयटीआर का महत्त्वाचा?


तु्म्ही भरलेला आयटीआर हा तुमच्या उत्पानाचा दाखला मानला जातो. याद्वारे तुम्हाला  बॅंकेतून कर्ज मिळताना देखील अडचणी होत नाहीत. विमा कंपन्यांही विमा देताना आयटीआर संदर्भातील कागदपत्रांना महत्त्वाचा पुरावा मानते. एखादी व्यक्ती कर सवलतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवत असेल तर त्याला आयटीआर भरणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही त्या मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न मिळवत असाल आणि तरीही प्रात्पिकर विविरण पत्र भरले तरीही नुकसाना होत आहे. या उलट आयटीआर दाखल केल्यास तुम्हाला अनेक लाभ देखील मिळू शकतात.