Income Tax Return: ITR फाईल संदर्भात मोठी अपडेट, या तारखेआधी रिटर्न न भरल्यास दंड
Income Tax Return: तुम्ही कर भरता का? या प्रश्नाचे अनेक लोकांचे उत्तर असे असते की ते कराच्या कक्षेत येत नाहीत. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर तुम्ही शून्य ITR (0 ITR) दाखल करणे आवश्यक आहे. ते भरणे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
मुंबई : Income Tax Return: तुम्ही कर भरता का? या प्रश्नाचे अनेक लोकांचे उत्तर असे असते की ते कराच्या कक्षेत येत नाहीत. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर तुम्ही शून्य ITR (0 ITR) दाखल करणे आवश्यक आहे. ते भरणे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. आयकर विभागाकडून 2021-22 (AY 2022-23) या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न फॉर्म (ITR फॉर्म) अधिसूचित करण्यात आला आहे. 15 जून 2022 पासून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सुरुवात झाली आहे.
जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर 31 जुलैपूर्वी तुमची आयटीआर फाइल भरा. यानंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. मात्र, 31 जुलै तारीख जवळ येईल, तसतसा आयकर विभागाच्या वेबसाइटवरील लोड वाढतो, ज्यामुळे तुम्हाला टॅक्स रिटर्न भरताना समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळेआधीच फाइल भरा.
तुम्हाला ऑफिसमधून फॉर्म-16 मिळाला असेल, तर लवकरात लवकर आयटीआर फाइल करा. कारण आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित करण्यात आली आहे. यानंतर आयटीआर भरण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी कोणत्याही विलंब शुल्काशिवाय आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. अंतिम मुदतीनंतर आयकर रिटर्न भरण्यासाठी, आयकर कलम 234A आणि कलम 234F अंतर्गत दंड भरावा लागेल. वैयक्तिक HUF साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.
याशिवाय, ज्यांना ऑडिटची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. तर TP अहवाल आवश्यक असलेल्या अशा व्यवसायासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.