LPG Cylinder : महागाईने (Inflation) सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. त्यात आणखी एक भर म्हणजे सिलिंडरच्या किमतीतही दरवाढ सुरूच आहे. मागील अडीच वर्षात सिलिंडर (LPG Cylinder Price) 41 टक्क्यांनी महाग झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिलिंडरच्या किमती या जागतिक बाजारात (Global market) 3 पटीने वाढल्या आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिक महागाईच्या चटक्यांमुळे (Inflation)चोहोबाजूने होरपळून निघत आहे. कोरोना काळात म्हणजेच मागील अडीच वर्षात सिलिंडर (LPG Cylinder Price) 41 टक्क्यांनी महाग झाला आहे. सध्या दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रुपयांवर गेली आहे. एप्रिल 2020 पासून आत्तापर्यंत पाहिले तर LPG गॅस सिलेंडर सुमारे 41 टक्क्यांनी महाग झाला आहे. ही किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, परंतु जागतिक बाजाराच्या तुलनेत ही वाढ खूपच कमी आहे. 


जागतिक बाजारपेठेत LPG किती महाग?


सरकारने (Government) राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2020 ते जुलै 2022 पर्यंत म्हणजेच अडीच वर्षात, जागतिक बाजारपेठेत किंमत प्रति टन $ 236 वरून $ 725 प्रति टन झाली आहे. यावरून जागतिक बाजारपेठेत एलपीजीच्या किमतीत 203 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. त्याच वेळी, एप्रिल 2020 पासून भारतात घरगुती गॅस सिलेंडरची (14.2 किलो) किंमत 309 रुपयांनी वाढली आहे. ही किंमत 744 रुपये प्रति सिलेंडरवरून 1053 रुपये झाली आहे.